गावच्या यात्रेदिवशी जवान प्रशांत कदम अनंतात विलीन, माण तालुक्यांतील दानवलेवाडी हळहळली, विजेचा शॉक लागून जवानाचा दुर्दैवी मृत्यू, संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. माण तालुक्यांतील दानवलेवाडी गावचे सुपुत्र आणि भारतीय सेवेतील जवान प्रशांत दिलीप कदम (वय 35) यांना शुक्रवारी सकाळी नळाच्या पाण्याला विद्युत मोटर लावत असताना अचानक विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने या प्रवाहाचा स्पर्श जवान प्रशांत कदम यांना झाला हे दुष्य पत्नीने आरडाओरडा सुरू केला, तेथील नागरिकांनी त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारांपूर्वीच वैद्यकीय डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, त्यांच्या अचानक निधनाने दानवलेवाडी गावासह माण तालुक्यांत शोककळा पसरली आहे, जवान प्रशांत कदम हे आसाम मध्ये हवालदार पदी कार्यरत होते, दानलेवाडी गावची वार्षिक यात्रा असल्याने ते दहा दिवसांपूर्वीच सुट्टीवर आले होते घरांमध्ये यात्रेची लगबग सुरू होती, यात्रेच्या मुख्य दिवशीच सकाळी नळाच्या पाण्याला विद्युत मोटर लावत असताना विद्युत प्रवाह अचानक उतरल्यामुळे जवान प्रशांत कदम यांना मोठा धक्का बसला यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिंवावर शासकीय मानवंदना देवुन जड:अंतकरणाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला, यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, अमर रहे अमर रहे प्रशांत कदम अमर रहे..! जब तक सुरज चांद रहेगा प्रशांत तेरा नाम रहेगा ! अशा घोषणांनी दानवलेवाडी दुमदुमली होती, यावेळी भारतीय लष्करी सेवेतील आणि सातारा पोलीस दलाकडून त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली, दानलेवाडी गावातील आजी-माजी सैनिक सर्व ग्रामस्थ यांच्यासह माण तालुक्यांतील पोलिस अन् महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या पार्थिंवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली, जवान प्रशांत कदम यांच्या निधनाने संपूर्ण परिसरांत हळहळ व्यक्त होत आहे,
