सहसंपादक – गोपाळ भालेराव शिवाजीनगर (पुणे):आज दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी शिवाजीनगर पोलिसांना गडचिरोली पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी पुणे येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनं हद्दीत असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी त्या आरोपीचा शोध घेऊन त्याला आपल्या ताब्यात घेतले व गडचिरोली पोलिसांना सोपविले सदरील घटनेची सविस्तर माहिती अशी की.
गडचिरोली पोलीस ठाण्या कडील गु.र.नं.२३१/२०२५ भा. न्या. संही. कलम १०३ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयीत इसम नाव विशाल ईश्वर वाळके हा नरवीर तानाजी वाडी शिवाजीनगर परिसरात असल्या बाबत गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे सदर बाबत मा. पोलीस उप-आयुक्त परि १ यांना कळवुन त्यांचे सुचने प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. चंद्रकांत सुर्यवंशी तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रमोद मोहिते, चोबे, आहेर, माने, भोसले, हंडगर, सांगवे, गायकवाड असे नरवीर तानाजी वाडी शिवाजीनगर परिसरात जावुन त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन सहा.पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड स्थानीक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस उप निरीक्षक दिपक चव्हाण यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परि.१, पुणे श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, श्री. साईनाथ ठोंबरे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. चंद्रकांत सुर्यवंशी तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रमोद मोहिते, चोबे, आहेर माने, भोसले, हंडगर, सांगवे, गायकवाड शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे.
