एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मोक्यातील पाहिजे असलेल्या , सराईत गुन्हेगारांना लष्कर पोलीसांनी केली अटक

कार्यकारी संपादक : किरण सोनवणे. पुणे : दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी पुणे येथील लष्कर पोलिसांना रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना वाटमारी. मारहाण करून लुटणे. शस्त्राचा धाक दाखवून जवळील रोख रक्कम हिसकावून घेणे. परिसरात खंडणी मागणे. अश्या प्रकारचे अनेक गुन्हे नावावर नोंद असलेल्या आरोपीचा लष्कर पोलीस ठाणे पोलिसांना हवे असलेले गुन्हेगार हवे होते ते योगायोगाणे आज रोजी त्यांच्या हाती लागले. सविस्तर बातमी अशी की.लष्कर

पो.स्टे.गु.र.नं.२०/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०९ (६),३२४(२),१२६(२),३ (५) सह भारतीय हत्यार अधिनियम कलम ४/२५ या गुन्हयात दिनांक ०३/०२/२०२५ रोजी पुना कॉलेज जवळ कॅम्प पुणे या ठिकाणी फिर्यादी हा त्याच्या मोटार सायकल वरुन पहाटे ०५:४५ वाजन्याच्या सुमारास जिमला जात असताना, त्यास अज्ञात आरोपींनी अडवुन व शस्त्राचा धाक दाखवुन त्याच्या कडील १२००/-रुपये जबरीने काढुन घेतले होते. त्याबाबत अज्ञात विरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपी नाव १) इरफान उर्फ इप्पा इम्तियाज खान, वय ३० वर्ष, रा.७२१, चुडामन तालीम, भवानी पेठ, पुणे व २) सोहेल सलिम खान, वय २७ वर्षे, रा. चुडामन तालीम चौक, भवानी पेठ, पुणे यांनी फिर्यादीस रस्त्यात अडवुन धारधार शस्त्राचा धाक दाखवुन मारहाण केली व त्याच्या खिशातुन १२००/-रुपये जबरदस्तीने काढुन घेतले असे निष्पन्न झाले होते. त्यावरुन सदर आरोपींचा शोध चालु होता. सदर गुन्हयात आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

वरील आरोपी यांनी त्याच दिवशी सदर गुन्हा केल्या नंतर खडक पोलीस ठाणेच्या हद्दित दोन इसमांना शस्त्राचा धाक दाखवुन डोक्यात, हातावर वार करुन जखमी केले होते व वर्चस्व दाखविणे करीता दहशत निर्माण केली होती. त्याबाबत खडक पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १) ७७/२०२५, भा.न्या.सं. २०२३ चे कलम १०९,३५१ (२), ३५२, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७. भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), सह १३५, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२).३ (४).२) ७८/२०२५, मा.न्या.सं.२०२३ चे कलम ३२४ (४),३५१(२), ३५२, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७. भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), सह १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडक पोलीस ठाणे कडील गुन्हयांस मोक्का कायद्यान्वये कारवाही करण्यात आली आहे.

वरील नमुद गुन्हयां व्यतीरीक्त आरोपींनी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दित पानटपरी चालक यांस देखिल शस्त्राचा धाक दाखवुन मारहाण केली होती. प्रस्तृत प्रकरणी बंडगार्ड पोलीस ठाणे गु.र.नं.४२/२०२५, भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०९ (६),३२४ (४).३५१ (२) (३), ३५२, भारतीय हत्त्यार कायदा कलम ४/२७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३), सह १३५. प्रमाणे दाखल आहे.

वरील प्रमाणे आरोपीं विरुद्ध गुन्हे दाखल असुन, गुन्हा केल्या नंतर आरोपी हे पुणे शहरातुन बाहेर सोलापुर, कुर्डवाडी परिसरात राहत होते. दिनांक १६/०४/२०२५ रोजी आरोपी हे न्यु गोदीखाना, कॅम्प, पुणे येथे आल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेवुन आरोपी १) इरफान उर्फ इप्पा इम्तियाज खान, वय ३० वर्ष यांस दिनांक १६/०४/२०२५ रोजी १६/३० वा. आरोपी २) सोहेल सलिम खान, वय २७ वर्षे यांस दिनांक १७/०४/२०२५ रोजी पहाटे ०४/३० वाजता अटक केली आहे आरोपींवर खडक, लष्कर, बंडगार्डन, फरासखाना व वानवडी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

सदर ची कामगिरी, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविण पाटिल, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटिल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे, श्री. दिपक श्रीमंत निकम, मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक, लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. गिरीषकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. प्रदिप पवार, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विशाल दांडगे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरिक्षक राहुल घाडगे, महिला पोलिस उप निरीक्षक ज्योती कुटे, व पोलीस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिरडे, प्रविण गायकवाड, सचिन मांजरे, चौघर, अतुल मेंगे, लोकेश कदम, सागर हराळ, अमोल कोडीलकर यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link