अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष: उत्तम कांबळे यांचे विचारमंथन नागपुरात
नागपूर, दि. १५ एप्रिल २०२५: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त महावितरण, नागपूर परिमंडळातर्फे एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, कादंबरीकार, पत्रकार, संपादक, विचारवंत आणि परखड वक्ते उत्तम कांबळे हे या व्याख्यानात आपले विचार व्यक्त करणार आहेत.
महावितरणच्या गड्डीगोदाम येथील प्रकाश भवनच्या प्रांगणात हा कार्यक्रम रंगणार आहे. या वैचारिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत असणार आहेत. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, महापारेषणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सतिश अणे आणि मराविमं सूत्रधारी कंपनीचे प्रभारी मुख्य अभियंता राकेश जनबंधू हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता (प्रकल्प) मंगेश वैद्य, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) संजय वाकडे आणि चाचणी मंडळाचे अधीक्षक अभियंता योगेंद्र निचत यांची देखील उपस्थिती असणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आणि त्यांचे समाजातील योगदान यावर उत्तम कांबळे मार्गदर्शन करणार आहेत. या ज्ञानवर्धक व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन आयोजन समितीने केले आहे.
छायाचित्र: – उत्तम कांबळे
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
