एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय क्षेत्रीय कार्यालय नागपूर येथे सामाजिक आर्थिक सर्वेक्षणावर एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय क्षेत्रीय कार्यालय नागपूर येथे सामाजिक आर्थिक सर्वेक्षणावर , एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

नागपूर १५ एप्रिल २०२५

व्यक्तिमत्व विकासाबरोबरच राष्ट्राच्या विकासासाठी शिक्षण हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून शिक्षण या घटकावर विस्तृत आणि सविस्तर माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्याचे प्रमाण,शिक्षणावर होणारा प्रत्येक कुटुंबाचा खर्च, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती,इत्यादीची माहिती सरकारी स्तरावर उपलब्ध असणे गरजेचे आहे. यालाच अनुसरून केंद्रीय सांख्यिकी कार्यालय मार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजार्थिक सर्वेक्षणाच्या 80 व्या फेरीमधून ही माहिती संकलित केली जाणार असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय नागपूर विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक श्रीनिवास उप्पला यांनी केले.

एन.एस.एस. सामाजार्थिक सर्वेक्षण – 80वीं फेरी संदर्भात एक दिवसीय क्षेत्रीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज 15 एप्रिल मंगळवार रोजी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (क्षेत्र संकार्य विभाग), क्षेत्रीय कार्यालय, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.क्षेत्रीय कार्यालय नागपूरचे संचालक आणि क्षेत्रीय प्रमुख श्री रंगा श्रीनिवासुलु, श्री सी. के. मेश्राम, उपसंचालक, घरगुती सर्वेक्षण युनिट (एचएसयू), नागपूर आणि श्री सुनील ए. वैरागडे सहाय्यक संचालक यावेळी उपस्थित होते.

एनएसएसच्या 80 व्या सर्वेक्षण फेरीचे मुख्य लक्ष्य हे कुटुंबाने शिक्षणावर केलेल्या खर्चावर राहील. यापूर्वी एनएसएसच्या सर्वेक्षण फेरीने टेलिकॉम क्षेत्रात आणि सध्या शिक्षण क्षेत्रात माहिती संकलन करण्यास सुरुवात केलेली असून यानंतरचे सर्वेक्षण हे घरगुती पर्यटन संबंधित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. एनएसएसच्या 80 व्या सर्वेक्षण फेरीपासून सर्वेक्षण पूर्ण करण्याची कालमर्यादा ही कमी राहील जेणेकरून विविध मंत्रालयांना माहिती पुरवण्यास विलंब होणार नाही.
एन एस एस च्या या 80 व्या सर्वेक्षण फेरीतून अचूक आणि योग्य माहिती संकलित केल्या जाईल असा विश्वास श्रीनिवास उप्पला यांनी व्यक्त केला आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) 1950 पासून राष्ट्राच्या सेवेत आहे, एन.एस.एस. द्वारे करण्यात येणार्या देशव्यापी नमुना सर्वेक्षणांद्वारे विविध सामाजार्थिक निर्देशकांवर एक मजबूत डेटाबेस तयार केला आहे. या आकडेवारीमुळे केंद्र आणि राज्य सरकारांना विकास उपक्रमांचे नियोजन करण्यात आणि धोरणे आकार देण्यात मदत झाली आहे. एन.एस.ओ. समाजाच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी धोरणांचे नियोजन, संशोधन, निर्मिती आणि अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण इनपुट प्रदान करून, या संस्थेने गोळा केलेली आकडेवारी राष्ट्राच्या विकासात मोठी भूमिका बजावते.
या सर्वे फेरीच्या माध्यमातून विविध सामाजिक-आर्थिक मुद्द्यांवर सर्वेक्षण केले जातात ज्यामध्ये,घरगुती वापराचा खर्चरोजगार आणि बेरोजगारीसंघटित आणि असंघटित क्षेत्रअपंगत्व आणि आजारपणदेशांतर्गत पर्यटन खर्चकर्जे आणि गुंतवणूकजमीन आणि पशुधनपिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि राहण्याची परिस्थितीवेळेच्या वापराचे सर्वेक्षण केले जाते.
व्यापक मॉड्यूलर सर्वेक्षण – शिक्षण (CMS-E: एप्रिल ते जून, 2025) हे सध्या चालू असलेले N.S.S. सामाजार्थिक सर्वेक्षण – 80वीं फेरीच्या सर्वेक्षणाचा भाग म्हणून समाविष्ट केले जाईल.या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट शिक्षणाशी संबंधित निर्देशकांची माहिती गोळा करणे आहे यामध्ये प्रामुख्याने शिक्षण या घटकावर कुटुंबांने केलेल्या खर्चावर लक्ष केंद्रित करणे असून या सर्वेक्षणात अंदमान आणि निकोबार बेटांमधील गावे वगळता संपूर्ण भारतीय संघराज्यांचा समावेश असेल.
एन.एस.ओ. चे कुशल आणि प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचारी ई-सिग्मा सॉफ्टवेअरने सुसज्ज असलेल्या उपकरणांचा (टॅब्लेट) वापरुन माहिती गोळा करतील.हे अधिकारी वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन केलेल्या नमुने घेण्याच्या तंत्रांवर आधारित निवडक गावे आणि शहरी ब्लॉकना भेट देतील.यामध्ये सर्व कुटुंबांची यादी केली जाते आणि घरातील प्रमुख किंवा घरातील जबाबदार आणि जाणकार व्यक्तीची मुलाखत घेऊन सर्व कुटुंब सदस्यांची तपशीलवार माहिती गोळा करण्यासाठी विशिष्ट कुटुंबांची निवड केली जाते. सांख्यिकी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डेटा संकलनासाठी प्रशिक्षित करण्यासाठी हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.

एन.एस.ओ. या प्रशिक्षण शिबिरात क्षेत्रीय संकार्य विभागाचे सुमारे 80 क्षेत्र अधिकारी/कर्मचारी सहभागी होतील. घरगुती सर्वेक्षण युनिट NSO चे प्रतिनिधी देखील यात सहभागी होतील अशी माहिती यावेळेस देण्यात आली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link