भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महावितरणचे विनम्र अभिवादन
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर दि. 14 एप्रिल 2025 :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त महावितरण त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. ‘विश्वरत्न’, ‘महानायक’ आणि ‘अर्थशास्त्राचे प्रकांड पंडित’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीदिनी महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये आदराने स्मरण करण्यात आले.
महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि चंद्रपूर परिमंडळालाचे मुख्य अभियंता हरीश गजबे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महानिर्मितीचे उपमुख्य अभियंता अंकूर जोशी, महावितरणचे अधीक्षक अभियंता राकेश जनबंधू, अमित परांजपे, मंगेश वैद्य, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर, वरिष्ठ व्यवस्थापक (विधी) डॉ. अविनाश आचार्य यांच्यासह महावितरण आणि महानिर्मिती कंपनीतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. आंबेडकरांना आदराने नमन केले.
प्रकाश भवन येथे वृक्षारोपण:
महावितरणच्या गड्डीगोदाम येथील प्रकाश भवन, नागपूर शहर मंडल कार्यालयाच्या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी अधीक्षक अभियंता अमित परांजपे, मंगेश वैद्य, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, संजय श्रृंगारे, सहायक संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) प्रशांत तुळशी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पराग फाटे यांच्यासह कामगार संघटनेचे प्रकाश निकम उपस्थित होते.
फोटो ओळ:
1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना महावितरण व महानिर्मितीचे अधिकारी आणि कर्मचारी.
2. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते वृक्षारोपण.
