मधु ताराच्या सहकार्याने 134 व्या भीम जयंतीच्या दिवशी माउलींना मोफत कृत्रिम पाय बसवण्यात आला.*
संपादकीय
दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी महामानव विश्वरत्न बोधिसत्व संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निम्मित मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या सहकार्याने पुण्यातील दापोडी भागात राहणाऱ्या शालुबाई विठ्ठल कांबळे या ज्येष्ठ माउलींना मोफत कृत्रिम पाय बसवण्यात आला.
*साधू वासवानी मिशन टेक्निशियन श्री ज्ञानेश्वर पाटील सर आणि त्यांच्या टीमने खूपच चांगल्या प्रकारे पाय बसवण्यास सहकार्य केले.
मधुमेहाच्या आजारामुळे पायाला गँगरीन झाल्यामुळे शालुबाई यांचा पाय काढावा लागला होता.*
तीन महिन्यापूर्वी शालुबाई यांना मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांनी त्यांच्या दापोडी पुणे येथे घरी जाऊन मोफत वॉकर भेट दिले होते.*
*आज भीम जयंतीच्या दिवशी मोफत कृत्रिम पाय बसवण्यात आल्यामुळे आनंद व्यक्त करत शालुबाई कांबळे आणि त्यांच्या परिवाराने मधु तारा आणि साधू वासवानी मिशन यांचे आभार मानले.*
*मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी नेहमी मधु ताराच्या दिव्यांगाना कृत्रिम पाय केलीपर बेल्ट बसवण्यास सहकार्य करणाऱ्या साधू वासवानी मिशन ट्रस्ट पुणे यांचे आभार व्यक्त करीत आहे.*
