अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसाच्या कृती आराखडा संकल्पनेतून विश्वस्तांची कार्यशाळा यशस्वी संपन्न
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सखाराम कुलकर्णी
नांदेड -महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांचा कृती आराखडा या संकल्पनेतून व धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मादाय सह आयुक्त कार्यालय नांदेड विभाग नांदेड ने आयोजित केलेल्या विश्वस्तांची कार्यशाळा दि.२२-०३-२०२५ रोजी यशस्वी संपन्न झाली .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखडा या संकल्पनेतून आयोजित केलेली विश्वस्तांची कार्यशाळा दि.२२-०३-२०३५ ला प्रगती महिला मंडळ मगनपुरा नांदेड येथे संपन्न झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी धर्मादाय सह आयुक्त नांदेड श्रीमती हिरा का.शेळके तर माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. तसेच अॅड. मुकुंद चौधरी ,सुधाकर टाक यांची पण प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यशाळेत श्रीमती ममता यो. राखडे धर्मादाय उपआयुक्त नांदेड यांनी धर्मादाय रुग्णालयाशी संबंधित कायदेशीर व रुग्णांना उपयोगी पडणारी महत्वाची माहिती दिली. श्रीमती पानसरे मॅडम सहाय्यक धर्मादाय आयुक्त परभणी यांनी विश्वस्तांच्या नेहमीच उपयोगी पडणारे न्यासांची विविध प्रकारच्या बदल अर्ज/ फेरफार अर्जाविषयी अतिशय सुलभ भाषेत माहिती दिली. तसेच सदरील कार्यशाळेत सनदी लेखापाल रवींद्र भारतीय यांनी न्यासांना करावे लागणारे ऑडिट रिपोर्ट व त्यामधील विविध बारकावे याच्या पद्धती विषयी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर कार्यालयातील जेष्ठ विधीज्ञ अॅड मुकुंद चौधरी यांनी न्यासांना कर्ज घेणे करिता घ्यावी लागणारी दक्षता व त्या संबंधित लागणारी कागदपत्रे याची कायदेशीर बाजू समजावून सांगितली. अध्यक्षीय भाषणात श्रीमती हिरा शेळके यांनी धर्मादाय कार्यालय नांदेड ने मागील एका वर्षात केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामे व न्यायिक कामाचा केलेला थोडक्यातआढावा सांगीतला. तसेच मागील एक वर्षात ८७६५ प्रकरणांचा निपटाला या कार्यालयाकडून करण्यात आल्याची माहिती दिली. या कार्यशाळेत उपस्थित असलेल्या अनेक विश्वस्तांनी न्यायिक अधिकारी, सनदी लेखापाल आणि ज्येष्ठ विधीज्ञ यांच्यासोबत प्राथमिक स्वरूपातील सुसंवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. बी.जी .मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक धर्मादाय आयुक्त नांदेड श्रीमती वैशाली चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन अॅड. विलास भोसले यांनी केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी धर्मादाय सह आयुक्त नांदेड, प्रगती महिला मंडळ नांदेड, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड, आणि संत पाचलेगांवकर महाराज मुक्तेश्वर सेवा आश्रम वसंत नगर नांदेड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यशाळा यशस्वीतेसाठी कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत नांदेड, परभणी व हिंगोली येथील विधिज्ञ व शेकडो विश्वस्त उपस्थित राहून न्यासांचे संबंधित कायदेशीर ज्ञानाची मेजवानी लुटली.
