शिवसेना कसबा विधानसभेच्या वतीने निलेश गिरमे यांची महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले स्मारक व भिडे वाडा
समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यांचा सन्मान,
प्रतिनिधी शंकर जोग पुणे
शिवसेना कसबा विधानसभा मतदार संघाच्या वतीने निलेश गिरमे यांची महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले स्मारक व भिडे वाडा समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा व युवा सेना महाराष्ट्र राज्य सचिव किरण साळी यांचा भव्य सत्कार गंजपेठ येथील महात्मा फुले वाडा समता भूमीमध्ये शिवसेना कसबा विधानसभेच्या वतीने शॉल पुष्पगुच्छ व महात्मा फुले यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी समितीचे अध्यक्ष निलेश गिरमे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी महात्मा फुले वाडा पूर्ण पाहणी करून या भागातील विकास कामाच्या दृष्टीने नागरिकांशी संवाद साधला,
याप्रसंगी शिवसेना पुणे शहर शिक्षक शिक्षकेतर संघाचे पुणे जिल्हाप्रमुख अनिल गडकरी सर, शिवसेना कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप, विभाग संघटक अतुल कच्छावे, समन्वयक आकाश गायकवाड, प्रभाग प्रमुख संतोष कांबळे, उपविभाग प्रमुख सागर घोलप, आदि यावेळी उपस्थित होते
