प्रतिनिधी : मुकुंद कांबळे : चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या व्यथा व समस्या यांचे व्यथा मांडणारे एकमेव कला दिग्दर्शक विशाल सावंत यांना आता अजून एक जबाबदारी मिळाली आहे. दादासाहेब फाळके चित्रपट युनियन यांनी विशाल सावंत यांची कोकण अध्यक्ष पदी निवड केली आहे. या पदनियुक्तीमुळे कोकण विभागातील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यात कलावंतांसाठी पर्वणीचे दिवस येणार आहेत. चित्रपट क्षेत्रातील कलावंत आणि तंत्रज्ञान हक्कासाठी एकमेव व्यासपीठ दादासाहेब फाळके चित्रपट युनियन ही आता मोठ्या जोमाने उभी राहणार आहे. त्याचबरोबर चित्रपट आणि मालिका या क्षेत्रात काम करणारे कलावंत तंत्रज्ञान यांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी विशाल सावंत यांची नियुक्ती केली आहे. दादासाहेब फाळके चित्रपट युनियन केवळ चित्रपट नाही तर मालिका क्षेत्रातील कलावंतासाठी व तंत्रज्ञान व्यक्तीसाठी काम करत आहे. दादा साहेब फाळके चित्रपट युनियन ही कलावंताचं न्याय हकलासाठी चित्रपट आणि मालिका क्षेत्रात कार्यकरीत आहे. प्रत्येक क्षेत्रातील कलावंतानी या दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मध्ये सहभागी होण्यासाठी किंवा सभासद होण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. चित्रपट असो या मालिका प्रत्येक तंत्रज्ञ आणि कलावंत यांनी दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे सभासद व्हावे अशी विनंती विशाल सावंत यांनी केली आहे.
कोट विशाल सावंत यांची नियुक्ती म्हणजे दादा साहेब फाळके चित्रपट युनियन यांच्या मार्फत कलाकारांना योग्य तो न्याय व समस्या सोडवण्याचा उत्तम उपाय होय दादासाहेब फाळके चित्रपट युनियन वाढवण्यासाठी त्यांचा अनुभव आणि कार्यप्रणाली यांचा संगम होईल ही अपेक्षा व्यक्त करतो
अजित म्हामुणकर ( अध्यक्ष दादा साहेब फाळके चित्रपट युनियन)
