प्रतिनिधी – राजेश दामधर : जालना जिल्हातील जाफ्राबाद तालुक्यातील भारज बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात संत सेना महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
संत सेना महाराज हे एक वारकरी संप्रदायातील संत असून त्यांना ज्ञानदेव नामदेवांच्या परिवारातील सदस्य म्हणून मानले जात होते
त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बांधवगड मध्ये झालेला आहे
संत सेना महाराज हे नाभिक समाजाचे होते
ज्ञानेश्वर तुकाराम महाराज इतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जात होते
यावेळी उपस्थित सरपंच सौ, शकुंतलाबाई रामचंद्र तेलंग्रे यांचे सुपुत्र शरद तेलंग्रे, ग्रामसेवक सीआय पठाण, उपसरपंच, रहीम टेलर, घरकुल विभाग जाफ्राबाद,कर्मचारी योगेश्वर देवडे, सर, रोजगार सेवक, एम डी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, समाधान दामधर, समितीचे सदस्य, विजय देशमुख, राजेंद्र गायकवाड, ज्ञानेश्वर पेंटर, संजय शिंदे, ब्रह्मा शिंदे, महेश शिंदे, सुरेश वखरे, ज्ञानेश्वर झगरे, श्याम वैद्य, गणेश वैद्य, वैभव शिंदे, कृष्णा शिंदे, संतोष राऊत, सतीश झगरे आदी नाभिक समाज व गावकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
