संपादकीय : दिनांक 12 मार्च 2025 रोजी शिवचेतना अपार्टमेंट.वकील पेठ.रेशिमबाग चौक नागपूर शहर येथे मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशनचा आरोग्य. दिव्यांग मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम असंख्य माता भगिनी यांच्या उपस्थित उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मधु तारा वर्धा जिल्हा प्रमुख श्री महेंद्रजी दांडगे होते.
सुनीताताई दाभाडे यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी भटक्या विमुक्त साठी कार्य करणाऱ्या सीमाताई कश्यप यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
या वेळी अतिशय छान प्रकारे सूत्रसंचलनाची जबाबदारी शीतलताई चामाटे यांनी पार पाडली.
मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी आरोग्यावरच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना.मनपाच्या समाजविकास विभागाच्या योजना.जिल्हा परिषद दिव्यांग विभागाच्या योजना तसेच निराधारांच्या महिला बाल विकास विभाग.संजयगांधी निराधार.श्रावण बाळ.अशा राज्य सरकारच्या योजना आणि मधु ताराचे राज्यभर सुरू असलेली सेवा तळागाळातील लोकांना मिळणारे लाभ यांची माहिती देऊन शिक्षण.रोजगार या सर्वच विषयांवर मार्गदर्शन केले.
या वेळी असंख्य माता भगिनी यांनी सरकारच्या योजनांची माहितीच आम्हाला नाही असे म्हणत मधु तारा प्रमुखांच्या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या प्रसंगी मधु तारा प्रमुखांनी ह्रदयस्पर्शी गीत आणि आज देवाला सुटी आहे ही कविता सादर केली त्या वेळी असंख्य माता भगिनींचे डोळे पाणावले.
या वेळी पुण्यातील स्थायिक नागपूरच्या मधु तारा सोबती ज्येष्ठ समाजसेविका मालाताई मुन आवर्जून उपस्थित होत्या.
खूपच छान प्रकारे कार्यक्रम झाल्या बद्दल आयोजक.नियोजक तसेच उपस्थितांचे आभार मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी मानले.
