प्रतिनिधी : आदित्य चव्हाण.पौड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५४८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (५),११५(२),३५२,३५१ (२),१८९(२),१९०,१९१ (२), महाराष्ट्र सावकारी अधिनियम सन २०१४ कलम ३९ व ४५ या गुन्हया मधील पाहिजे आरोपी नामे. रवी नरसिंग पवार, वय ४२ वर्षे, रा.स.नं.२९६ लक्ष्मीनगर हडपसर पुणे हा गुन्हा घडल्यापासुन पोलीसांना गुंगारा देवुन स्वतःची अटक चुकवत होता. दि.१२/०३/२०२५ रोजी गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना त्यांचे बातमीदाराने सदर आरोपी रवी नरसिंग पवार हा हडपसर इंडस्ट्रीयल एरिया जवळील कचरा डेपो समोर हडपसर पुणे येथे उभा असल्याची बातमी दिल्याने लागलीच सदर ठिकाणी छापा टाकुन आरोपी नामे. रवी नरसिंग पवार यास ताब्यात घेवुन खंडणीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील श्री. युवराज हांडे, विजयकुमार शिंदे तसेच पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, अमित कांबळे, विनोद शिवले, राजस शेख, शशिकांत नाळे, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, स्वाती गावडे व उमाकांत स्वामी यांचे पथकाने केली आहे.
