प्रतिनिधी : आदित्य चव्हाण. दि.११/०३/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे मुंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना मिळालेले बातमीवरुन मुंढवा कोरेगांव पार्क रोडने शहा यांचा मोकळा प्लॉट, मुंढवा पुणे येथे इसम नामे १) प्रमोद सुधाकर कांबळे, वय ४४ वर्षे रा किल्ला वेस, करमाळा सोलापुर पुणे २) विशाल दत्ता पारखे वय ४१ वर्षे रा प्लॅट नं ६, मोहन नगर, आदित्य सोसा. विश्रांतवाडी पुणे यांच्या ताब्यात एकुण १६,८०,०००/- रु.कि. चा गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द मुंढवा पोस्टे गु.र.नं. ७७/२०२५. एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, मयुर सुर्यवंशी, संदिप जाधव, संदिप शेळके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांनी केली.
