जागतिक महिला दिनानिमित्त व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशन व रिलायन्स मॉलच्या वतीने विविध कार्यक्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा रिलायन्स मॉल एरंडवना येथे उत्साहात संपन्न झाला.
जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी. या उक्ती प्रमाणे स्त्री च्या आयुष्याची सुरवात संसारापासून जरी होत असली तरी स्वतःचे घरदार सांभाळून स्त्री ने सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, व्यवसायिक, कला, क्रिडा ई सर्वच क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध करून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे आणि याचे श्रेय जाते ते फक्त आणि फक्त ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना. ह्या माऊलीने स्त्रियांच्या जीवनातील अंधःकार दूर करून स्त्री चे जीवन शिक्षण ज्योतीने उजळवले. ह्या माऊलीचे पूजन घरा घरात व्हावे म्हणून योगिताताई गोसावी यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा कर्तृत्ववान महिलांचा गौरव केला. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व शिवगर्जना करून करण्यात आली.
सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी रणरागिणी बाऊन्सर दीपाताई परब, दिपालीताई निखळ, मंगलताई नागुल, वर्षा तांबोळी यांना, पत्रकारिता क्षेत्रात सारिकाताई रोजेकर यांना, व्यावसायिक क्षेत्रात जयश्रीताई येरझारी, भूमिकाताई शित्रे यांना, 12 किल्ले 12 महिने या स्तुत्य उपक्रमासाठी किर्तीताई कोकाटे व त्यांची महिला टीम यांना, कला क्षेत्रात स्नेहल साधू, शुभदाताई कोकिल व माधवी मोरे यांना, क्रीडा क्षेत्रात स्मिता सावर्डेकर यांना, शैक्षणिक क्षेत्रात शमिकाताई पवार यांना, या सर्व कर्तृत्ववान महिलांचा गौरव मान्यवर सामाजिक कार्यकर्त्या संजीवनीताई बालगुडे, शिवसेनेचे राजेशभाऊ मोरे, रोहिणीताई कोल्हाळ, अभिनेत्री तेजस्वीनी पायगुडे, चित्रपट निर्माते शैलेंद्र निर्मळे यांच्या हस्ते करण्यात आला. वसुंधरा ग्रुपच्या वतीने प्रश्नमंजुषा घेण्यात आली त्यामध्ये पंचशीला कदम यांनी तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन मानाची पैठणी जिंकली. दंताळे ज्वेलर्सच्या वतीने 7 लकी ड्रॉ विजेत्या महिलांना आकर्षक गिफ्ट्स देण्यात आले. या कार्यक्रमात 5 वर्षाच्या स्वामिनी काटे हिने “स्त्री अबला नाही तर सबला आहे” यावर उत्कृष्ट वक्तृत्व केले. शुभरा भुरुक या विद्यार्थिनीने नृत्यातून गणेशवंदना सादर केली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व पुरस्कारार्थी महिलांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले व पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विशाल कंठाळे, अलका शेरसांडे, वंदना जैन, उमा चिंचवडे, शुभांगी पाटील, अश्विनी निकम, राधिका शिंदे व राधिका मेड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रिलायन्स मॉल एरंडवना, मॅनेजर प्रतीक वखारिया, ज्योतिष तज्ञ डॉ रवींद्र बर्वे व दंताळे ज्वेलर्स या सर्वांच्या सपोर्टमुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाचे आयोजन वसुंधरा ग्रुपच्या संस्थापिका योगिताताई गोसावी यांनी केले होते.
