प्रतिनिधी समाधान पाटील जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील थेपडे माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक पी डी चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात छान परसबागेची निर्मिती केलेली असून परसबागेत कांदे, गिलकी,मिरची, वांगी, कोथिंबीर,भेंडी इत्यादी पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. परसबागेतून निर्मित वांगे ,टमाटे, कोथिंबीर यांचा वापर अधून मधून शाळेच्या बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांच्या भोजनात आणि शालेय पोषण आहाराच्या मेन्यूमध्ये केला जातो. परसबागेतील पिकांची निगा राखणे, त्यांना पाणी देणे, निंदणी करणे इत्यादी कामे विद्यार्थी नियोजनाप्रमाणे करतात. नियोजनाप्रमाणे नेमून दिलेल्या विद्यार्थिनी नियमितपणे परसबागेची स्वच्छता करीत असतात. परत बागेत काम करताना आम्हाला आनंद मिळतो अशी भावना विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर यांच्याजवळ व्यक्त केली.
नागदुलीचे शेतकरी श्री सुनील तुकाराम माळी यांनी परसबागेसाठी वांग्यांची रोपे दिली. तसेच सचिन चव्हाण सर आणि एस सी बाविस्कर सर यांनी टमाट्यांची रोपे दिली. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी परसबागेची निगा राखण्यास मदत करतात.
