सौ. कलावती गवळी विकास मीना यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून स्वीकारला पदभार, विकास कामात मागे पडलेला जिल्हा पुढे आणणार..! यवतमाळ जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागेवर अखेर शासनाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे विकास मीना यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवनियुक्त जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहून आपला पदभार स्वीकारला यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी त्यांचे स्वागत केले, नवनियुक्त जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या नियुक्तीमुळे यवतमाळ जिल्ह्याला सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारा जिल्हाधिकारी लाभला, विकास मीना हे सन 2018 च्या तुकडीतील प्रशासकीय सेवेतील ( आयएएस ) अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत असताना अधिकारी कर्मचाऱ्यांना कामकाजात शिस्त लावणे मुख्य प्रशासकीय इमारतीचे काम मार्गी लावणे, जल जीवन मशीन विविध घरकुल योजना स्वच्छता भारत मशीन या कामांमध्ये मागे पडलेला जिल्हा हा राज्यांत आणि विभागांमध्ये देखील पहिल्या काही जिल्ह्यांमध्ये आणण्याचे काम त्यांनी केले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि भौतिक सुविधा सुधारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. या सोबतच ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी देखील ते नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे सध्या यवतमाळ जिल्ह्यात सर्व सामान्यांना न्याय देणारा जिल्हाधिकारी मिळाला असे बोलण्याचे जात आहे, यावेळी नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच ठाम ग्वाही देखील दिली विकास कामात मागे राहिलेला यवतमाळ जिल्हा हा मी पुढे आणण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे.
