गोपाळ भालेराव – हिंगोलीचा राजकिय व विकासाचा अनुषेश दुर करण्याची राष्ट्रवादीला संधी.
वसमत मंत्रिमंडळात रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस कडून मराठवाड्यातील दुसऱ्यांदा निवडून आलेले वसमतचे आमदार राजू नवघरे यांना मंत्री करून हिंगोली जिल्ह्यातील राजकीय आणि विकासाचा अनुशेष दूर करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली आहे त्यामुळे आता अजितदादा पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्री पद रिक्त झाले आहे,सरकार स्थापन होताना सुरुवातीपासूनच राजू नवघरे यांचे नाव आघाडीवर होते परंतु ऐन वेळेला त्यांचा पत्ता कट झाला,त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीत नाराजी पसरली.ही नाराजी दुर करण्याची संधी आता आली आहे. मराठवाड्यात तरुण आमदार म्हणून राजू नवघरे यांची ओळख आहे, मागील पाच वर्षात हिंगोली जिल्ह्यात अजितदादांची राष्ट्रवादी वाढवण्यात राजू नवघरे यांचा मोठा वाटा आहे, 2019 च्या निवडणुकी पासून अजित दादा खंबीरपणे नवघरे यांच्या पाठीशी आहेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान तुम्ही नवघरे यांना दुसऱ्यांदा संधी द्या मी त्याच सोनं करतो अशा शब्दात मंत्रिपदाचे आश्वासन दादांनी दिले होते, परंतु ऐन वेळेला नवघरे यांचे नाव मागे पडून ज्येष्ठांना संधी दिली गेली परंतु आता एक मंत्री पद रिक्त झाले आहे,त्यामुळे ही संधी आता नवघरे यांना दिली जावी. असा सूर हिंगोली जिल्ह्याच्या राष्ट्रवादीतून उमटत आहे.नवघरे यांना मंत्री केल्यास हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम होईल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता नवघरे यांना संधी दिल्यास त्याच ते सोनं करतील असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे, त्यावेळी नवघरे यांच्या नावाची चर्चा जोरदार आहे. त्यासोबतच नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार चे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे देखील नाव चर्चेत आहे परंतु ते ऐन वेळेला राष्ट्रवादीत आले असल्याने आणि अजूनही राष्ट्रवादी ते रमले नाहीत त्यामुळे त्यांच्या ऐवजी निष्ठावंत राजू नवघरे यांचा पक्ष विचार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
