सतीश कडू : नागपूर दि. 12 मार्च 2025 – मराठी मनाचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारे, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारे आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्यांच्या लोकशाही ताकदीचे भान देणारे स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंती निमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले.
महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन या मुख्य अभियंता दिलीप दोदके यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य व संजय वाकडे, विधी सल्लगार सुनिल उपाध्ये, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रणाली विश्लेषक प्रविण काटोले, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांचेसह अधिकारी व कर्मचा-यांनी देखील यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. यावेळी महावितरण आणि महानिर्मितीचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फ़ोटो ओळ – यशवंतराव चव्हाण यांना महावितरणचे अभिवादन.
