प्रतिनिधी: किशोर रमाकांत गुडेकर जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईतील प्रभादेवी येथील रविंद्रनाट्यमंदिर येथे‘शिवदुर्गा’ सन्मान सोहळ्याचे आयोजन शिवसेने मार्फत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या कडून लाडक्या बहिणींशी संवाद साधण्यात आला. उपस्थित महिलांनी शुभेच्छा देत महायुती सरकारच्या पुनरागमनाचा आनंद व्यक्त केला.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत १५०० रुपये मिळणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यात आले. तसेच, उद्योजिका आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. सरकार २१०० रुपयांची वाढीव रक्कम देण्याचा विचार करत आहे, आणि योजना कधीही बंद केली जाणार नाही, याची खात्री दिली.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सौ. वृषाली शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, महिला नेत्या मीनाताई कांबळी, उपनेते मा.आमदार सिद्धिविनायक ट्रस्ट अध्यक्ष श्री सदा सरवणकर तसेच मा.नगरसेवक युवा नेतृत्व श्री समाधान सरवणकर व अनेक मान्यवर तथा शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
