प्रतिनिधी – समाधान पाटील जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे –गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता 2024 अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक पं.ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हसावद विद्यालयात दर सोमवारी शालेय परिपाठानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची शारीरिक स्वच्छता तपासणी केली जाते. आज सोमवारी विद्यार्थी शारीरिक स्वच्छता उपक्रमांतर्गत शालेय परिपाठ झाल्यावर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची नखे, केस, कान,नाक आणि गणवेश इ. स्वच्छतेबाबतची तपासणी सर्व शिक्षकांनी केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी. डी.चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक स्वच्छतेचे मार्गदर्शन करताना सर्वांनी दररोज अंघोळ करावी. आपली नखे केस वाढू देऊ नयेत. तसेच नाक, कान यांची स्वच्छता राखावी व स्वच्छ गणवेश परिधान करावा.स्वच्छ गणवेशाने आपले मन प्रसन्न व आनंदित राहून अभ्यासात मन रमते व आपण संसर्गजन्य रोगांपासून स्वतःचा बचाव करून निरोगी जीवन जगू शकतो. असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक बच्छाव सर, पर्यवेक्षक के पी पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक पिंगळे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण सर ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख वाय पी चिंचोरे सर, आणि सांस्कृतिक समिती प्रमुख एस जे पवार सर उपस्थित होते. सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.
