अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…
सतीश कडू : आज दि. 06/03/25 रोजी नागपूर वरून उमरेड मार्गे ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहनावर पोलिस ठाणे उमरेड परिसरात कारवाई करण्यात आली.
घटना ता.वेळ-दि-06/03/25 चे 16/30 वा. दर.
घटनास्थळ-बायपास चौक उमरेड
नाव आरोपी:-
1) अनुराग गौतम जांभूळकर, वय 28 वर्ष
2) मंगेश दिलीप गेडाम, वय 29 वर्ष दोन्ही रा. देलनवडी, ता ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर
3) पाहिजे आरोपी रोहित शिवणकर, रा. तदोडी, ता. नगभिड, जिल्हा चंद्रपूर
जप्त मुद्देमाल –
1) 240 पॉकेट होला हुक्का शिशा कंपनीचा सुगंधित तंबाखू प्रत्येकी 1 किलो व की 820/- रु प्रमाणे 1,96,800/- रु
2) 198 पॉकेट ईगल हुक्का शिशा कंपनीचा सुगंधित तंबाखू प्रत्येकी 400 ग्रॅम व की 640/- रु प्रमाणे 1,26,720/- रु
3) 110 लहान डब्बे maza 108 कंपनीचा सुगंधित तंबाखू प्रत्येकी 50ग्रॅम व की 235/- रु प्रमाणे 25,850/- रु
4) टाटा हॅरीअर चार चाकी क्र MH-44-S-3838 कि 15,00,000/- रु
एकूण 18,49,370/- रु चा मुद्देमाल
आरोपी विरुद्ध पोलिस ठाणे उमरेड येथे कलम. 123,274,275,223,3(5),49 BNS r/w 26(2)(1),26(2)(IV),3(1)(ZZ),27(3)(e),30(2)(a) अन्न सुरक्षा व मानके कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून वरील नमूद मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
कार्यवाही पथक:- पोलीस निरीक्षक श्री.ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात
सहा. पो. नि. सागर गोमासे, पोउपनी बटूलाल पांडे, स.फौ. मिलिंद नांदुरकर, पो.हवा. विष्णू जायभाये, मयूर ढेकळे, रोहन डाखोरे, अमृत कीनगे, पोशी मनीष नेवारे, सर्व स्थानीक गुन्हे शाखा, सायबर सेल चे सतिष राठोड तसेच पोलिस ठाणे उमरेड येथील पोहवा राधेश्याम कांबळे, मंगेश फेदजवार, पोना पंकज बट्टे, पोशी/संदीप गुट्टे, गोवर्धन सहारे यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
