अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
कार्यकारी संपादक – किरण सोनवणे : चाकण आरपीआय आठवले गटाच्या व्यापार आघाडीचा पदाधिकारी सचिन वाघमारे याने मयत प्रवीण गायवाड नामक व्यक्तीला आत्महतेस प्रवृत्त केल्याबद्दल वाघमारे याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, सचिव वाघमारे आणि आत्महत्या केलेला प्रवीण गायकवाड याच्या बायकोचे अनैतिक संबंध असल्याने त्याची बायको मयत प्रवीण गायकवाड याला घरात तुच्छ वागणूक देत होती. तसेच हा नेता त्याच्या राजकीय बळाचा वापर करून मयत झालेल्या प्रवीण गायकवाडला मानसिक त्रास देत असल्याच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे प्रवीणने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्याचं बरोबर प्रवीणने लिहिलेल्या चिठ्ठीत अनेक त्याला छळलेल्या गोष्ठीचा उल्लेख केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चाकण पोलिसांनी प्रवीण गायकवाडने लिहिलेली चिट्ठी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.
आत्महत्या केलेल्या प्रवीण गायकवाडने दुसरी एक चिट्ठी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यानाही लिहिली आहे कि, आरोपी सचिन वाघमारे आपल्या राजकीय पदाचा वापर करून हे प्रकरण मिटू शकतो तर साहेब विनंती आहे मला न्याय दया आणि स्वतःच्या मुलाच्या नावाचा उल्लेख करून प्रवीणने आपले जीवन संपवले आहे. या आरपीआय नेत्याचे अनेक कारनामे या अगोदरहि समोर आले आहेत. कुणाचेही नाव सांगून पैसे वसुली करणे, कोणाच्याही छोट्या छोट्या प्रकरणात लक्ष घालून काही आर्थिक हितसंबंध जोपासता येतात कि काय याची चाचपणी करणे असे एक ना अनेक प्रकरणे या नेत्याने गाजवलेली आहेत. त्यातच या नेत्याच्या आंबट चाळ्यांमुळे आज एका होतकरू व्यक्तीचे आयुष्य संपले. त्या होतकरू तरुणाचा संसार उद्वस्थ करून स्वतःला राष्ट्रीय नेता समजणाऱ्या सचिन वाघमारेला जेलची हवा खायला जायची वेळ आली.
या नेत्यावर चाकण पोलीस ठाण्यात आत्महतेस प्रवृत्त केल्याबद्दल गभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तलवारे हे करत आहेत.
