अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…
प्रतिनिधी – समाधान पाटील : आज दि. 6/3/2025 रोजी म्हसावद थेपडे विद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी.चौधरी यांनी भूषविले.व्यासपीठावर उपमुख्याध्यापक जी.डी.बच्छाव,जेष्ठ शिक्षक एस.एम.पिंगळे,सौ.नेवे,एस.एम.नेतक,शिक्षक प्रतिनिधी चव्हाण,शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी वाघ,गांधी विचार संस्कार परीक्षा समन्वयक आर.आर.महाजन आणि एन व्ही पवार उपस्थित होते.गांधी विचार संस्कार परीक्षेत विद्यालयातील 685 विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग घेतला.यात जिल्हास्तरावर विद्यालयाची इयत्ता आठवी अ ची विद्यार्थिनी वेदिका गणेश आमले हिने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.तृतीय क्रमांकाचे चार विद्यार्थी मानकरी ठरलेत.त्यामध्ये अनुक्रमे सृष्टी पितांबर मराठे इयत्ता आठवी अ,कार्तिकी समाधान मराठे इयत्ता आठवी अ,विवेक आबा पाटील इयत्ता नववी अं आणि तन्मय जगदीश धनगर इयत्ता नववी अ या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि जेष्ठ शिक्षकांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल्स आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष पी डी चौधरी यांनी गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन केले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून पी डी चौधरी यांनी गांधीजींच्या जीवनातील विविध घटनांची माहिती सांगून विद्यार्थ्यांना गांधीजींच्या विचारांचे महत्व पटवून दिले.विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सत्य,अहिंसा,प्रेम,करुणा,वासल्य या सदगुणांचा अवलंब करून आपले जीवन सर्वांग सुंदर करावे,असा मौलिक सल्ला दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.जे.पवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी सहकार्य केले.
