अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…
आळंदी :पुणे जिल्ह्यातील आळंदी मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीर्थक्षेत्र आळंदी येथील नामांकित वारकरी संस्थेत एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन महाराजांवर मंगळवारी रात्री उशिरा पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धार्मिक शिक्षण देणारा महाराज महेश पोपट नरोडे ( वय २७ वर्षे) आणि आणि गौरव दत्तात्रय माळी (वय २१ वर्षे) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. दरम्यान जानेवारी महिन्यापासून तिस-यांदा अशी घटना घडल्याने महाराजांच्या गैरकृत्याबाबत आळंदीत संताप व्यक्त केला जात आहे. दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलगा विधीसंघर्षित बालक आहे. ही घटना जानेवारी महिन्यात घडली. पिडित मुलगा हा रात्री जेवण करून अन्य मुलांसोबत झोपला होता. यावेळी रात्री बारा ते एकच्या दरम्यान आरोपी गौरव माळी हा पिडित मुलाच्या जवळ येवून झोपला आणि अश्लिल चाळे करू लागला. तसेच शरिरसंबंधाची मागणी करू लागला. सलग तीन दिवस असाच प्रकार आरोपी माळीने संबंधित विद्यार्थ्यासोबत केला. त्यानंतर या घटनेची माहिती पिडित मुलाने महेश नरोडे याला सांगितला. मात्र नरोडे याने कोणतीही कारवाई केली नाही. तसेच घरच्या लोकांना सांगू नको अशी धमकीही दिली. अखेर पिडित मुलाने दिघी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.
