अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे कर्वे रोड श्री गणेश हॉल येथे झोमेटो कंपनीशी सलग्न दिव्यांगांच्या रोजगार या संबंधी कार्यक्रम पार पडला.
या वेळी स्वतः सक्षम बनून आपणही रोजगार करू शकतो म्हणून झोमेटो सोबत फूड डिलिव्हरी साठी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल* *फाऊंडेशनच्या पुणे शहर अध्यक्षा सौ मीनाक्षीताई शिंदे आणि असंख्य दिव्यांगांनी झोमॅटोच्या माध्यमातून नावनोंदणी करून प्रशिक्षण घेतले त्याचेच प्रात्यक्षिक आजच्या कार्यक्रमात होते.
या वेळी युथ फॉर जॉबचे प्रमुख हैदराबाद येथील श्री समीरजी नायर. मुंबईचे श्री श्रीकांतजी फडके.झोमॅटोचे पुण्याचे प्रमुख श्री आशुतोषजी सामंत.बजाज फीनेसरीच्या सुरभी मॅडम.आणि असंख्य दिव्यांग यांनी सहभाग घेतला.
या वेळी मधु तारा प्रमुख यांनी एक मेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ हे शरीर आहे नाशवंत पण कार्य रहाते अनंत म्हणत दिव्यांगांच्या सक्षमी करण साठी राबविण्यात आलेल्या उपक्रमासाठी सर्वांचे आभार व्यक्त केले.
