अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
सावली तालुक्यातील जिबगाव येथे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. स्व. किशोर चुदरी यांचे अल्पशा आजाराने ३ मार्च रोजी दुःखद निधन झाले, तर सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा भाजपाचे नेते राजुभाऊ देशमुख यांच्या मातोश्रींचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गडचिरोली ग्रामीण रुग्णालयात निधन झाले.
या दुःखद घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा नेते राकेश गोलेपलीवार यांनी भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेल्या माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. खा. अशोकजी नेते यांना दिली. यावर क्षणाचाही विलंब न करता मा. खा. अशोकजी नेते यांनी जिबगाव येथे भेट देऊन चुदरी व देशमुख परिवाराच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आणि त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना मानसिक आधार दिला.
या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाशभाऊ पाल, तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतिशभाऊ बोम्मावार, गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, ज्येष्ठ नेते अरुणजी पाल, भाजपा कोषाध्यक्ष तथा युवा नेते किशोरजी वाकुडकर, सरपंच पुरुषोत्तम चुदरी, दलित आघाडी तालुकाध्यक्ष लोकनाथजी रायपूरे, माजी सरपंच दुर्गाताई गेडाम, अनिल येंगंटीवार, युवा नेते सुरजभाऊ किनेकर, उपसरपंच नरेश बाबनवाडे, साखरीचे उपसरपंच रविंद्र गेडाम, आशिषभाऊ भांडेकर, राजू देशमुख (अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी, जिबगाव), दिलीप चुदरी, अशोकजी पाल, निलकंठ भोयर (माजी संचालक, सेवा सहकारी सोसायटी), नामदेव डांगे, बाबुराव गेडाम, मारोती गेडाम, किसनजी बोरकुटे, रामदास बोरकुटे, दिलीपजी लाडे, मापारी कुमार रोहनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मा. खा. अशोकजी नेते यांच्या या सांत्वन भेटीमुळे दोन्ही कुटुंबीयांना भावनिक आधार मिळाला असून ग्रामस्थांनी त्यांच्या सहवेदनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
