चैतन्य भाषा प्रसार मंडळ व स्वरमाला म्युझिक कारवा यांच्या संयुक्त विद्यमाने निवारा वृद्धाश्रम या संस्थेमध्ये भावगीत व भक्ती गीतांची सुरेल मैफल
प्रतिनिधी गणेश तारू
महिला दिनानिमित्त चैतन्य भाषा प्रसार मंडळाच्या अध्यक्ष सौ. अनिता बल्लाळ जोशी. यांनी मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी निवारा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसमोर भावगीत भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी निवारा वृद्धाश्रमातील सर्व आजी-आजोबा उपस्थित होते त्यांनी मनसोक्त मनमुराद या गाण्यांचा आस्वाद घेतला.
गायिका सौ सई जाधव. सौ प्राची जोशी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी उत्तम गायन शैलीने कार्यक्रम खूप सुंदर पार पाडला
संस्थेचे सौ. मुग्धा पत्की. श्रीमती कुमुद बिल्ला. बाबू शेख. अमोल शिनगारे.बल्लाळ जोशी . या सर्वांनी या कार्यक्रमाचे संयोजन नियोजन करून कार्यक्रम उत्साहात पार पाडला
