कोकण रेल्वे कोकणवासीयांसाठी हायचं नायं वाटतं? मी एक मुंबईकर कोकणवासी चाकरमानी
प्रतिनिधी :-दौलत सरवणकर
कोकण रेल्वे कोकणवासीयांसाठी हायचं नायं वाटतं कोकणात रेल्वे धावावी म्हणून ग्रामस्थ कोकणवासीयांना अनेक स्वप्न दाखवली गेली आमिष दाखविली गेली होती. चाकरमान्यांनी आपल्या बापजाद्यांच्या सुपीक जमीनी भारतीय रेल्वे बोर्डाला कोकण रेल्वे व्हावी म्हणून कवडीमोलाने देऊन टाकल्या होत्या आणि त्यांना वाटलं होतं यापुढे आपला गावी जायाचा येण्याचा प्रवास हा सुखकारक समाधानकारक होईल व आपल्या गावाला सुखरूप सुखद असे जाता येता येईल. पण जेव्हा कोकण रेल्वे कोकणात धावू लागली आणि तिचा विस्तार अनेक राज्यांतून रेल्वे बोर्डाने करून टाकला परराज्यातून कर्नाटक केरळ आणि इकडे पंजाब राजस्थान गुजरात या राज्यांतील प्रवाशी कोकण रेल्वेतून मार्गावरुन प्रवास करू लागले ये जा करु लागले तेव्हा कोकणवासीयांचा भ्रमनिरास झाला आणि त्यावेळी वेळ निघून गेली होती.
कोकणवासीयांसाठी कमी मोजक्या गाड्या ठेवून परराज्यातील प्रवाशांसाठी येण्याजाण्यासाठी अनेक मार्ग अनेक उपक्रम खुप साऱ्या गाड्यांची व्यवस्था भारतीय रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि परराज्यातील प्रवाशांसाठी अशा ग्रीन कारपेट अंथरूण रेल्वेची तिजोरी भरावी म्हणून कोकण रेल्वे पंजाब राजस्थान गुजरात कर्नाटक केरळ या मधुन कोकणात धावू लागल्या नंतर २५ वर्षाच्या कालावधीत कोकणात परप्रांतीय वाढण्याचे हे सुद्धा एक कारण आहेच.
सांगायचा मुद्दा असा की जानेवारी फेब्रुवारीत कोकणात जाण्यासाठी ऑफ सीजन समजून मी स्लीपर कोचची तीन महिन्यांपूर्वी मडगाव ते मुंबई कन्फर्म तिकीट मिळाली होती.जेव्हा गावावरुन मी मुंबईला येण्यासाठी माझ्या स्लीपर कोच डब्यात गेलो तेव्हा माझी सीट पकडावी म्हणून स्लीपर कोच डब्यातील जनरल डब्यात जेवढी गर्दी असते तेवढीच गर्दी माझ्या स्लीपर कोच डब्यात बघून मी भांबावून गेलो हैराण झालो होतो. स्लीपर कोचची कन्फर्म तिकीट काढून कन्फर्म सीट असून सुद्धा काहीच उपयोग झाला नाही. उलट त्रास सहन करावा लागला तो वेगळाच स्लीपर कोच डब्यात कोकणवासी चाकरमानी कमी दिसत होते आणि परराज्यातील प्रवाशांनी स्लीपर कोच डब्या खचाखच भरलेला मला तसा अनुभवायला मिळाला होता.स्लीपर कोच डब्यात जनरल डब्याचं फिलीगं घेत स्वतःला आकडत मोडत सावरत धक्काबुक्की सहन करत शोरशराबा ऐकतच मी मडगाव मुंबई एक्सप्रेस गाडीतून आपली धगधगती धावती मुंबई गाठली आणि धन्यवाद केले आपल्या कोकण रेल्वे आणि कोकण रेल्वे बोर्डाचे! व्हयं महाराजा सांग महाराजा कोकणवासीयांचे हाल कधी संपणार आहेत धन्यवाद!
मुंबई ते गोवा ह्या मार्गांवर कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वेने विचार करावा जादा फेऱ्या तसेच जादा गाड्या वाढवण्याची नित्यांत गरज आहे!
मी एक मुंबईकर कोकणवासी चाकरमानी असे मत प्रवाशांना वाटतं आहे
