अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
आदित्य चव्हाण : आज दिनांक 27/02/2025 रोजी पुणे पोलीस आयुक्तालय तर्फे परिमंडळ पाच अंतर्गत आज दिनांक 27/02/2025 रोजी पुणे पोलीस आयुक्तालय तर्फे परिमंडळ पाच अंतर्गत कोंढवा पोलीस ठाणे आयोजित रमजान पूर्वतयारी बैठक सिटी लॉन्स पारगे नगर कोंढवा खुर्द पुणे येथे माननीय डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 यांचे अध्यक्षतेखाली सकाळी 11/00 ते 13/00 दरम्यान कोंढवा पोलीस स्टेशन येथील सिटी लॉन्स पार्क नगर कोंढवा खुर्द पुणे येथे आगामी रमजान ईद महिना अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील मस्जिद चे ट्रस्टी, सदस्य, मौलाना तसेच प्रतिष्ठित नागरिक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये मस्जिद चे मौलाना, ट्रस्टी, सभासद, सदस्य यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन रमजान सण उत्सव काळात शासनाने दिलेल्या नियम अटींचे व पोलिसांकडून दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे मार्गदर्शन केले. सदर बैठकी करता सहाय्यक आयुक्त पुणे मनपा श्री अमोल पवार (वानवडी रामटेकडी), घनकचरा विभागाचे आरोग्य निरीक्षक सुनील घोळवे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता रजत राठोड, अतिक्रमण विभागाचे विभागीय निरीक्षक नारायण साबळे, वानवडी कोंढवा विभागाच्या कनिष्ठ अभियंता (सांडपाणी विभाग) पुनम बिडकर, आरोग्य निरीक्षक सौ. राहत कोकणे मॅडम, महावितरण विभाग कोंढवा विभागाचे अवचरे साहेब, महावितरण कोंढवा एन आय बी एम विभागाचे गरजे साहेब असे उपस्थित होते.
तसेच कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक हाजी फिरोज, रईस सुंडके, हाजी गफूर पठाण, सौ. हसीना इनामदार, सौ.नंदा लोणकर तसेच कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील मस्जिद चे ट्रस्टी कारी इद्रिस, जाहिद शेख, सलीम शेख, अन्वर सुफी असे ट्रस्टी व मौलाना उपस्थित होते. सदर समन्वय बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, आम्ही स्वतः, पोलीस निरीक्षक गुन्हे), कोंढवा पोलीस स्टेशन. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबेवाडी पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन. हे उपस्थित होते.
तसेच कोंढवा पोलीस स्टेशन कडील खडीमशीन पोलीस चौकी अधिकारी, कोंढवा चौकी पोलीस अधिकारी उपस्थित होते.सदर बैठकीमध्ये त्यांना खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या.
1.मस्जिदचे आजुबाजूस/वाहनांची पार्किंग होवू देऊ नये मस्जिदमध्ये येणारे अनोळखी व्यक्ती संशयित व्यक्ती यांचे हालचालीवर लक्ष ठेवावे.
2.भिक्षेकरी लोकांना मस्जिद जवळ थांबू देवू नये.
3.ईद चे दिवशी नमाजास येताना शक्यतो वाहने मस्जिदचे आवारात आणू नयेत. तसेच वाहने मस्जिदच्या 200 मीटर बाहेर परिसरात इतर वाहतूकीस अडथळा होणार नाही अश्या प्रकारे पार्क करावीत. अश्या सूचना सर्व मुस्लिम बांधवांना कराव्यात
4.पोलीस स्टेशन पोलीस चौकी ॲम्बुलन्स अग्निशामक दल, कंट्रोल रूम चे संपर्क नंबर मस्ज्दिचे दर्शनीय भागावर बोर्ड लावावेत.
5.पुरेसा प्रकाश राहील अशा लाईटची पर्यायी व्यवस्था ठेवावी.
6.मस्जिद मध्ये ज्वलनिशल (उदा रॉकेल पेट्रोल गॅस) असे पदार्थ ठेऊ नयेत. अपघाताने आग लागल्यास तात्काळ आग विझविण्या करीता अग्निशामक उपकरणे, वाळूच्या व पाण्याने भरलेल्या बादल्या सहज उपलब्ध होतील अशा ठिकाणी ठेवाव्यात.
7.मस्ज्दि मध्ये व मस्ज्दि समोर समाज कंटक गुन्हेगार यांचे संशायदस्पद हालचाली संशासादस्पद बेवारस वस्तू बॅग यांचे बाबत काही महिती मिळाल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे.
8.मस्जिद चे आतील आवारात व बाहेरील जाण्या-येण्याचे मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसवावेत. कॅमरे बसविले असल्यास व्यवस्थित काम करत आहेत का त्यांचे रेकॉडीग होत आहे का याची खात्री करावी. कमित कमी एक महिन्याचा बॅकअप ठेवावा
9.अफवांवर विश्वास ठेऊ नये. कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अफवा पसरली जाणार नाही याबाबत सूचना दयाव्यात, असे कोणी करत असल्यास त्यास प्रतिबंध करून पोलीसांना तातकळ कळवावे.
10.खाद्द पदार्थ विक्री करीता लावणारे स्टॉल धारक यांनी स्टॉल रस्ता सोडून वाहतूकीस अडथळा होणार नाही अशा पदधतीने लावण्यात यावे.
11.आक्षेपार्ह मेजेज सोशल मिडीयावरती पाठवू नयेत. या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्यास सांगितले. तसेच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. आगामी सर्व हिंदू मुस्लिम सण उत्सव हे शांततेत साजरी होते याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या.
