अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
भ्रष्टाचाराची चौकशी शासनाने करावी: हितेश मुंदाफळे
मतिमंद मुला -मुलींच्या शाळेतील आठ कर्मचाऱ्यांवर अन्याय ! त्वरित नोकरीवर ठेवण्यात यावे:
शोभाताई भाकरेंच्या शाळेची कठोर चौकशी करावी, भ्रष्टाचार विरोधी संघर्ष समितीची मागणी:
नागपूर : भ्रष्टाचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने तिलक शोर यांच्या नेतृत्वात दोन दिवसापासून संविधान चौक येथे २५ फेब्रुवारी पासून धरणा आंदोलनावर बसलेले आहेत. या सर्वाची एकच मागणी आहे की, आमचा एकच नारा, भ्रष्टाचाराची चौकशी करा. या पद्धतीचे आंदोलन सुरू आहे.
नागपूर शहरातील खरबी रोड, गुलशन नगर येथील 2006 पासून झंजावत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शोभाताई भाकरे मतिमंद मुला -मुलींची शाळा व कर्मशाळा यांच्यावर कठोर कारवाई करून नोकरीवरून कमी करणाऱ्या आठ कर्मचाऱ्याला न्याय देण्यात यावा. कारण या शाळेतले आठ कर्मचारी कामावरून कमी केले आहे. आणि दुसऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवल्या गेले असून त्यांच्याकडून प्रत्येकाकडून 27 लाख रुपये घेण्यात आलेले आहे. असा आरोप सुद्धा यांनी आंदोलनात केलेला आहे. या शाळेतील अवैध भ्रष्टाचाराचा कारभार चालत आहे. यावर कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी संविधान चौकात दोन दिवसां पासून आमच्या संपूर्ण मागण्यांकरिता धरणा आंदोलनाला बसलो आहेत. संत रविदास मित्रपरिवार संघटनेच्या वतीने समाजसेवक हितेश मुंदाफळे हे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. या आठ कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची कठोर चौकशी सरकार कडून किंवा प्रशासना कडून तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. जर मतिमंद शाळेतील आठ कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू ? असा इशारा हितेश मुंदाफळे यांनी दिलेला आहे.
