अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नोंदणी कुं.पिंपळगाव येथे रविंद्र तौर यांच्या नेतृत्वाखाली सुरू
जालना प्रतिनिधी हनुमंत दवंडे
आज दि.18 फेब्रुवारी 2025 रोजी कुंभार पिंपळगाव ता.घनसावंगी,जि. जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नोंदणी मोहिमेअंतर्गत सदस्य नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस श्री.रविंद्र तौर हे होते तर घनसावंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री.लक्ष्मण कंटूले, दत्तात्रय तौर, राधाकृष्ण भालेकर, फिरोजभाई कुरेशी, हारूनभाई पठाण, विलास तौर, रमेश पवार व रामप्रसाद कवचट यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अशी ग्वाही दिली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी जास्तीतजास्त सदस्य नोंदणी करून घेतली जाईल.
