अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मंठा नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदी सौ.छायाताई अरुण वाघमारे बिनविरोध निवड
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकरांच्या माध्यमातून तब्बल 15 वर्षांनी सर्वसामान्य कार्यकत्याला न्याय मिळाला – नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष
*=================*
प्रतिनिधी मंठा : नामदेव मंडपे
मंठा नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष पदी सौ.छाया अरुण वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
नगरपंचायत मंठा सभागृहामध्ये पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी परतुर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नगरपंचायत सदस्यांमधून उपनगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकी मध्ये नगरपंचायतचे मुख्याधिकारी दीपक इंगोले , प्रशासकीय अधिकारी मुजजमिल अन्सारी यांच्या सहाय्याने सौ छाया अरुण वाघमारे यांची बिनविरोध नगर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकरांनी शुभेच्छा देऊन मंठा शहरातील आगामी विकास कामात निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगितले , मंठा शहराच्या इतिहासात तब्बल 29 वर्षानंतर अनुसूचित जातीला मिळालेले हे पद असून यापूर्वी मंठा ग्रामपंचायत मध्ये पंडितराव गुणाजी वाघमारे यांची 1996 दरम्यान सरपंच पदी निवड झाली होती. त्या पाठोपाठ सौ छाया अरुण वाघमारे यांची 29 वर्षानंतर ही निवड झाल्याने एका सर्वसामन्य तळागाळातील व्यक्तीची काळजी करणारा , सर्वसामन्य कार्यकर्त्यप्रती संकट समयी धावून जाणाऱ्या कार्यकर्त्याला आमदार लोणीकरांच्या माध्यमातून खरा न्याय मिळाला असल्याची जनभवना आज नागरिकातून व्यक्त झाली.
यावेळी नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, नगरसेवक जे. के. कुरेशी, नगरसेवक नितीन राठोड, नगरसेवक नारायण दवणे, नगरसेवक दीपक बोराडे, नगरसेवक अचित बोराडे, नगरसेवक राजेश खंदारे, नगरसेवक प्रल्हादराव बोराडे, नगरसेवक प्रसाद बोराडे, नगरसेवक शेख साजिद, नगरसेवक बाज खा पठाण, नगरसेवक उबेद बागवान, नगरसेवक सचिन बोराडे, नगरसेवक विकास सूर्यवंशी,गौतम सदावर्ते,परमेश्वर मानकर,दादाराव हिवाळे, प्रकाश घुले,रंगनाथ वटाणे, शरद मोरे, शैलेश वटाणे,अशोक अवचार, ॲड सिद्धार्थ अवसरमोल, गजानन माळकर, अभिजीत कोदंडे,अतुल खरात, महादेव पाखरे, प्रदीप उघडे, समाधान शिंदे, नामदेव देशमाने,भगवान वाघ, महेंद्र टेकुळे,आर.डी खंदारे, शुभम अंभोरे, अजय खंदारे, आप्पासाहेब गवळी, अनिकेत देशमाने, विलास काऊतकर, अहिंसक वाघमारे, मारुती खनपडे, उद्धव सरोदे, विलास काऊतकर, अहिंसक वाघमारे, विजेश वाघमारे यांच्यासह सारनाथ युथ च्या सदस्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती .
