अजिंक्य महाराष्ट्र न्यूज असामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गोपाळ भालेराव
15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाने 20 पटाच्या आतील शाळांवर 2 शिक्षकांपैकी 1 कंत्राटी शिक्षक नियुक्तीची तरतूद करण्यात आलेली होती. तसेच यानंतर शासनाने 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिनी शासन निर्णय काढून 20 पेक्षा कमी पटाच्या शाळेवर कंत्राटी शिक्षक नेमणुकीची पद्धती स्पष्ट केलेली होती. त्यामुळे 20 पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांच्या अस्तित्वावर मोठे संकट निर्माण झाले होते. या अन्यायकारक तरतुदी विरोधात अटल शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य ने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केलेला होता. तसेच या विरोधात राज्यस्तरीय आंदोलनाची इशारा देखील शासनाला दिलेला होता.
याच पार्श्वभूमीवर 25 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर या मागणीसह इतर काही मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या होत असलेल्या आंदोलनाची दखल घेउन शासनाने 23 सप्टेंबर 2024 रोजी नविन शासन निर्णय काढून कंत्राटी भरती साठी 20 पटा ची अट 10 वर आणण्यात आली. तरी ही याबाबत अटल शिक्षक संघटनेने ही अट 10 वर आनन्या ऐवजी हा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी शासन दरबारी करून हा विषय लावून धरलेला होता.
त्यानंतर 5 जानेवारी 2025 रोजी मा. शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांची बैठक मुंबई मध्ये बोलावली. यामध्ये अटल शिक्षक संघटने मार्फत संघटनेचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष श्री जयंत आमटे सर यांनी संघटनेची भुमिका मांडून राज्यातील गुणवत्ता सुधारण्यासाठी च्या उपाययोजना मांडून त्या सोबत 10 पटाच्या आतील शाळांवर कंत्राटी शिक्षक भरती बाबत चा शिक्षक दिना दिवशी जाहीर झालेला काळा शासन निर्णय रद्द करण्याची आग्रही मागणी केली. तसेच 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयातील 20 पटाच्या आतील शाळांवर कमीत कमी 1 नियमित व 1 कंत्राटी ची अट वगळून 2 नियमित शिक्षक नियुक्ती बाबत दुरुस्ती ची मागणी केलेली होती. या बैठकीमध्ये हाच सूर बहुतांश संघटनांनी आवळला होता . शिक्षक मागण्या बाबत मा. शिक्षण मंत्री यांनी योग्य तो निर्णय घेणे बाबत आश्वास्त केलेले होते. याच अनुषंगाने काल दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी हा हा शासन निर्णय रद्द करण्यात आला.
याच अनुषंगाने मा. शिक्षण मंत्री महोदय श्री दादाजी दादाजी भुसे साहेब यांनी शिक्षण मंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्या पासुन अनेक अन्याय कारक शासन निर्णय रद्द करून शिक्षण क्षेत्रासाठी आश्वासक सुरवात केलेली आहे. त्यामध्ये पुस्तकाला जोडलेली वहीची पाने बाबतचा शासन रद्द करणे, मुलांच्या गणवेश राज्यस्तवरुन पुरवणे चा शासन निर्णय रद्द करणे व आता 10 पटाच्या आतील कंत्राटी शिक्षक भरती चा शासन निर्णय रद्द करणे. या उत्तम निर्णयांचा समावेश आहे.या आश्वासक सुरवात व शिक्षक विदयार्थी हिताबाबत निर्णय घेतले बाबत अटल शिक्षक संघटनेचे राज्यसचिव अमोल जाधव सर, राज्य कोषाध्यक्ष अजहर पठाण, राज्य समन्वयक निळकंठ शिंदे, राज्य सहसचिव विष्णू बडे, राज्य संघटक अशोक आकुसकर, राज्य उपाध्यक्ष मन्मथ बरडे सर आदींनी मा. शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब यांचे आभार मानले आहेत. तसेच शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र चांगले बदल घडविण्यासाठी राज्याध्यक्ष श्री जयंत आमटे सर यांच्या नेतृत्वाखाली अटल शिक्षक संघटना कायम शासना ला योग्य ते सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात हे होत असलेले बदल सर्व शिक्षक संघटना एका व्यासपीठावर येऊन एका आवाज मध्ये बोलत असल्याचा देखील परीणाम आहे. यामुळे आवश्यकतेनुसार शिक्षक हितासाठी शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सर्व शिक्षक संघटनाना सोबत घेउन जयंत आमटे सर यांच्या नेतृत्वाखाली अटल शिक्षक संघटना कायम शिक्षक व विद्यार्थी हितासाठी कार्यरत असेल असे प्रतिपादन संघटनेचे कोषाध्यक्ष श्री अजहर पठाण सर यांनी केले.
शिक्षण मंत्री महोदय यांनी बोलावलेल्या मीटिंग मध्ये भुमिका मांडताना अटल शिक्षक संघटना राज्य अध्यक्ष श्री जयंत आमटे सर.व इतर पदाधिकारी
