अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादक संतोष लांडे
डॉ इंजि प्रविण उपलेंचवार यांनी धूळे येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन गाजवीले
नुकतेच धूळे शहरात कला व वाणीज्य महाविद्यालयीन सभागृहात, मराठी साहित्य मंडळ आयोजित 10 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या दिमाखाने साजरे झाले. यात ग्रंथ दिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद ,काव्य स्पर्धा व पुरस्कार वितरण असे दिवसभर भरपूर कार्यक्रम होते. या संमेलनाचे उदघाटन धूळे चे माननीय आमदार श्री अनूज अग्रवाल यांनी केले. आमदार श्री अनुज अग्रवाल यांचा सत्कार मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जय प्रकाश घुमटकर यांनी केले. नंतर च्या परिसंवाद सत्रात नागपूर येथे विदर्भ प्रांत पाल या पदावर काम करणारे साहित्यिक डॉ इंजि प्रविण उपलेंचवार यांना मुद्दाम पाचारण करून बोलावण्यात आले होते .डॉ इंजि प्रविण मधुकर उपलेंचवार यांनी आजवर 175 पेक्षा जास्त कविता लिहून विविध कार्यक्रमात सादर केलेल्या आहेत. त्यांनी सुसाट नावाची 400 पानाची कादंबरी पण लिहिली आहे. तसेच त्यांनी ‘ तरंग मेंदीचे ‘ या अल्बममध्ये 18 गीते लिहून त्याचे संगीत दिग्दर्शन पण केले आहे. ते उद्योजक ,व्यावसायिक ,समाजसेवक व साहित्यिक असून त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय व इतर पुरस्कार त्यांच्या व्यावसायिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील कामासाठी देण्यात आले असून, या यादीत मागील वर्शे मिळालेला भारतातील सर्वात मोठा सामाजिक पुरस्कार नेशनल आइकॉन अवर्ड हा पण समाविष्ट आहे. डॉ इंजि प्रविण उपलेंचवार हे मुळात सिव्हिल इंजिनियर असून यांना आंतरराष्ट्रीय नामांकित vidyapith तर्फे ड .लीत ( मानद डॉक्टरेट ) ने पण सन्मानित करण्यात आले आहे. डॉ इंजि प्रविण उपलेंचवार यांचे मराठी साहित्य मंडळ चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी स्वागत व सत्कार केला. नंतर डॉ इंजि प्रविण उपलेंचवार यांचा परिचय सर्व उपस्थित प्रेक्षकांना करून देण्यात आला. मग डॉ इंजि प्रविण उपलेंचवार यांनी आपल्या खास खूमासदार शैलीत सुमारे 11 मीनिट ‘ मराठी साहित्य विश्वाचे बदलते स्वरुप ‘ या नियोजित विषयावर अत्यंत अभ्यास पूर्ण संभाषण केले. त्यांनी 800 वर्षांपासून संत dnyaneshwar ते आज चे सुप्रसिद्ध साहित्यिक गोलघुमट ( डॉ जय प्रकाश घुमटकर ) यांचे पर्यंत मराठी साहित्य कसे व कोणी घडवून पसरवत नेले , हे अत्यंत सविस्तर अभ्यास पूर्ण सादर करून व शेवट यावर कविता सादर करून प्रेक्षकांचि मने जिंकली.त्यानंतर सोलापूर येथे असलेल्या साहित्यिका डॉ रजनि दळवी यांनी सुंदर शैलीत या परिसंवाद सत्राचे समालोचन केले सकाळी दिमाखाने ग्रंथ दिंडी वाजत गाजत धूळे शहराच्या अनेक भागातून निघून ना कमलाबाई अजमेरा साहित्य नगरि परिसर या कार्यक्रमाच्या नियोजित परिसरात पोहोचली. नंतर उद्घाटन प्रसंगी स्वागताध्यक्ष ना. स्मिता अतूल अजमेरा यांनी कार्यक्रमाचे सुंदर प्रास्ताविक केले. त्यानंतर श्री सिद्धार्थ कुलकर्णी मुंबई. महानगर अध्यक्ष यांनी आपले बॉलिवूड मधील 35 वर्षांपासून चेअनुभव व अनेक साहित्य संमेलन आयोजन यासाठी केलेले प्रयत्न यावर सुंदर प्रकाश टाकला.नंतर डॉ जय प्रकाश घुमटकर संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मराठी साहित्य मंडळ यांनी आपल्या खास विनोदी शैलीत आपले अनेक साहित्य संमेलन आयोजित करिता आलेले अनुभव, त्याचे फलीत ,साहित्य सफर व आपली कविता सादर करून प्रेक्षकांना तृप्त केले. नंतर संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक व समाजसेवक मा.शशिकांत भदाने यांनी छान आपले अध्यशिय भाषण केले. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात महाराष्ट्रात दूरदूरुन आलेल्या सुमारे 50. कवीनि आपल्या मस्त रचना सादर करून कार्यक्रमा ला वेगळ्या दुनियेत घेऊन गेलेत. नंतर कार्यक्रमाचि सांगता आभार प्रदर्शना ने झाली. या संमेलना च्या यशस्वीतेसाठी डॉ जयप्रकाश घुमटकर व dhule मराठी साहित्य मंडळ यांचा पूर्ण परिवार व महाविद्यालयीन प्राचार्य व त्यांच्या चमू ने अथक प्रयत्न केलेत.
