अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सातारा लिंबचे पोलीस पाटील सुरेशराव सोपानराव पाटील यांनी सातारच्या नूतन जिल्हाधिकारी संतोष जी पाटील यांचे स्वागत अन् शुभेच्छा दिल्या,
सौ. कलावती गवळी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
साताऱ्यातील उत्कृंष्ट कामाचे बक्षीस म्हणून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, खास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जितेंद्र डूडी पुणे जिल्हाधिकारी म्हणून बक्षीस जाहीर केले होते, तर त्यांच्या रिक्त जागेवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सातारा जिल्हाधिकारी म्हणून 2 जानेवारी 2025 रोजी पदभार स्वीकारला आहे, आज सातारा जिल्हाधिकारी दालनामध्ये सातारा लिंबगाव चे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील सुरेशराव सोपानराव पाटील यांनी त्यांची सदिंच्छा भेट घेत आपला परिचय देवून स्वागत करीत शुभेच्छा दिल्या, यावेळी नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला, साताऱ्यात यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी राखलेली परंपरा संतोष पाटील हे कायम ठेवतील पर्यटन प्रकल्प, माझी शाळा आदर्श शाळा तसेच स्मार्ट पीएचसी असे काही महत्वकांक्षी प्रकल्पांना संतोष पाटील हे गती देतील अशी आशा सातारकरांकडून व्यक्त होत आहे, जिल्हाधिकारी संतोष पाटील हे मूळचे उंडेगांव (ता. बार्शी) सोलापूर येथील कार्यक्षम आणि मितभाषी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांनी आत्तापर्यंत प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, विशेष भूमी संपादक अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, रोहयो उपजिल्हाधिकारी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, मुख्यमंत्र्यांचे कार्यकारी अधिकारी अशा विविध पदावर त्यांनी आतापर्यंत आपल्या कामाचा चांगलाच ठसा उमटविला आहे,
