अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कळवा परिसरातून ठाणे शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन दहावी व बारावी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी यांचे साठी प्रवास व्यवस्था पाहणे करिता शिवसेनेचे सहकार्य
प्रतिनिधी दौलत सरवणकर
मंगळवार दिनांक 11/02/2025 पासून बारावी व शुक्रवार दिनांक 21/02/2025 पासून दहावीची परीक्षा होत आहे. सदर दोनही परीक्षांना कळवा शहरातील किमान हजार विद्यार्थी बस व ऑटो रिक्षा ने प्रवास करून परीक्षा देत असतात. परंतु सकाळी गर्दीचे वेळी बस व रिक्षा मिळत नाहीत. परीक्षेला सामोरे जात असताना त्या मुळे विद्यार्थी व पालक यांना टेन्शन येते व रिक्षावाले आणि विध्यार्थी भांडण होते. असे प्रसंग टाळून विद्यार्थी व पालक शांत चित्ताने सामोरे जाता यावे या उद्देशाने शिवसेना मागील कित्तेक वर्ष गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे सुचणे नुसार कळवा शहरातील विद्यार्थ्यांना ठाणे येथे जाऊन दहावी बारावी ची परीक्षा देणाऱ्याना बस मध्ये पुढील दरवाजाने प्रवेश करणे साठी मदत करीत आहेत. तसेच वेळ कमी असताना काही ऑटो रिक्षा वाले बांधव भाडे नाकारतात त्यांनाही विनंती करून भाडे घेणेस भाग पाडले जाते. आणि महत्वाचे म्हणजे काही विद्यार्थी फारच उशीरा बस स्टॉप वर येतात. त्यांना आपले पदाधिकारी स्वतःचे वाहनाने परिक्षा केंद्रात दाखल करतात.आज दिनांक ११/०२/२०२५ रोजी सकाळी
8=30. ते 10=00 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक कळवा येथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते त्यामुळे विध्यार्थीची प्रवासात कुठलीही गैरसोय झाली नाही.अश्या रीतीने शिवसेना कळवा विभागाने विध्यार्थ्यांना प्रवास सुखकर करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री. विजय देसाई उपजिल्हाप्रमुख कल्याण लोकसभा. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी :-श्री. दौलत सरवणकर
