अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादक संतोष लांडे
वडगाव धायरी – क्रांतीसुर्य वंदनीय कै. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त वडगाव धायरी येथील नवरत्न ओल्डेज होम येथील वृद्धाश्रमातील वृद्ध मातापित्यांना नथुराम गोडसे यांच्या भाची कांताताई देवधर यांच्या हस्ते अन्नदान देत कर्मरूपी आशीर्वाद मिळविले यावेळी क्रांतीसुर्य वंदनीय कै. अण्णाभाऊ जावळे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करत अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले
या विनम्र अभिवादनाच्या वेळी सा.का. सोनाली ताई भुसारी पाटील, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख आशिष भाऊ खंडेलवाल, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गणेश राऊत, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रेम भाऊ भुरे, दत्ताभाऊ यंडे, बिट्टू पांचाळ,विवेक चव्हाण, रियाज बसणे, विशाल जमदाडे, विठ्ठल कटके व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते क्रांतीसुर्य वंदनीय कै. अण्णासाहेब जावळे पाटील मराठ्यांचे क्रांतीसुर्य ज्यांनी मराठ्याची खरी ज्योत पेटवली स्वतःच्या जीवाची स्वतःच्या कुटुंबाची परवा न करता ज्यांनी उभा आयुष्य हे लोकसभेसाठी दिल आणि एक मराठ्यांचा इतिहास रचण्याचे ज्यांनी महान कार्य केलं आणि आपला आयुष्य मराठ्यांसाठी त्यागलं त्या मराठ्याच्या क्रांतीसुर्यांचा आज स्मृतिदिन त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा कार्य अन्नदान रुपी आज केलं आणि वृद्ध माता-पित्यांचे कर्मरूपी आशीर्वाद मिळवत अण्णासाहेबांनी पेटवलेले ज्योत अबाधित राखण्याचं कार्य सर्व छावे करतील आणि त्यांचा वारसा जपला जाईल असे मनोगत यावेळी साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत यांनी केले
या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष प्रेम भाऊ भुरे व महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गणेश राऊत यांनी केले होते
क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्मृतिदिनी नवरत्न ओल्डज होम येथे वृद्ध मातापित्यांना अन्नदान रुपी सेवा दिल्याबद्दल संस्थेच्या संस्थापिका सौ. अनिताताई राकडे यांनी मनस्वी आभार मानले
