एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सणसवाडी मधील तरुण रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर – हतबल तरुण संघर्षाच्या पवित्र्यात

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

संपादकीय

सांगा आमच्या तरुण /तरुणींचा गुन्हा काय? आमच्या तरुणांच्या हक्काचा रोजगार त्यांना का दिला जात नाही.? तरुण तरुणींनी जगायचं कसं.? का त्यांना जगण्याचा अधिकारच नाही.? भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांचा शासनाला गंभीर सवाल.

आम्हाला रोजगार मिळत नसेल तर काय दरोडेखोर आणि गुन्हेगार बनायचे का? तरुणांची संतप्त प्रतिक्रिया..

सणसवाडी गावात शेकडो कंपन्या… कंपन्यांमध्ये भरपुर रोजगार उपलब्ध , पण मुठभर लोकांच्याबरोबर कंपनी प्रशासनाचे आर्थिक हितसंबंध आणि मनगटशाहीच्या जोरावर कंपन्यांवर दबाव, संघटीत लुटीची व्यवस्थाच तरुणांच्या रोजगाराच्या आड येत आहेत –

कंपन्या आल्या पाहिजेत, चालल्या पाहिजेत, तसे स्थानिक तरुण /तरुणी ना ही जगण्यासाठी हाताला काम मिळालेच पाहीजे.

शासन स्तरावर उदासीनता आणि कंपन्या म्हणजे मुठभर राज्यकर्त्यांची सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच, त्यामुळे तरुणांच्यावर अन्याय..

कायदेशीर मार्गाने शासनाने न्याय द्यावा तरुणांना कायदा हतात घ्यायची वेळ येऊ देऊ नये – संजय पाचंगे यांची मागणी.

सणसवाडी ता. शिरुर सारख्या गावामध्ये शेकडो कंपन्या कार्यरत असुन स्थानिक तरुण-तरुणींना मात्र डावलले जात आहे, रोजगार मिळत नाही जर या ठिकाणी तरुण-तरुणी रोजगार मागण्यासाठी गेले तरुण लगेच त्यांच्या वरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते येथील स्थानिक तरुण-तरुणींना शेती क्षेत्राचा अभाव त्यातच येथील तरुण तरूणांना रोजगार मागण्यासाठी शासन स्तरावर कुठलेही दुसरे व्यासपीठ उपलब्ध नाही, मग तरुणांनी काय दरोडेखोर बनायचे का? काही दिवसांपूर्वी सणसवाडी येथील तरुणांनी मा. उपसरपंच सागर दरेकर यांच्या माध्यमातून भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांना बोलावून रोजगार मिळविण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत प्रथम शासनाकडे रोजगार नोंदणी करण्याचे आवाहन संजय पाचंगे यांनी केले होते. श्री सागर दरेकर यांनी सर्व तरुणांना मार्गदर्शन करत सणसवाडी गावातील २५० तरुणांनी रोजगार नोंदणी कार्यालयात नाव नोंदणी केली आहे. परंतु त्या कार्यालयाकडुनही अद्याप काही उत्तर मिळालेले नाही. त्यानंतर आज नोंदणी केलेले सर्व अर्ज आज मा. तहसीलदार तथा तालुका न्यायदंडाधिकारी शिरुर यांना देण्यात आले असुन कंपन्या व बेरोजगार तरुण यांची समन्वयाची बैठक बोलवावी अशी मागणी केली आहे. त्यांच्यासाठी शासनाने कायदेशीर मार्गाने न्याय द्यावा व त्या तरुणांना कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो असे संजय पाचंगे यांनी यावेळी बोलून दाखवले आहे.
सणसवाडी गावातील कंपन्यांनी स्थानिकांना ३०% रोजगार देण्याची लेखी हमी दिली असताना कंपन्या स्थानिकांना डावलत आहेत. तरुण तरुणींना अक्षरशः वणवण भटकायची वेळ आली आहे.
तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्याची भावना निर्माण झाली असुन आम्ही कोणत्या मार्गाने रोजगार मिळवायचा अशी खंत व्यक्त केली जात आहे. याबाबत सणसवाडी तरुणांनी तहसीलदार तथा तालुका न्यायदंडाधिकारी शिरुर व जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्याकडे न्यायाची आर्त हाक दिली आहे. प्रसासनाकडुन काय प्रतिसाद मिळतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link