अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गोपाळ भालेराव
पुणे (हवेली) : भूमिहीन दाखल्यासाठी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४०० रुपयांची लाच स्वीकारताना हवेली अप्पर तहसील कार्यालयातील दोन महिला संगणक चालकांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई पुणे सेतू येथे शुक्रवारी (ता.३१, जानेवारी) केली आहे. या कारवाईमुळे शासन मान्य सेतू केंद्रात मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा दाट संशय असून प्रत्येक व्यक्तीला कंम्पलसरी पैशाची मागणी केली जाते. या सर्व पैशाचे कलेक्शन कोण पाहत आहे.? कोणाला याचा आर्थिक फायदा होत होत आहे.? तहसीलदार कचेरी येथील कोणाचा यामध्ये सहभाग आहे का? तहसील कचेरी या कारवाईची गंभीर दखल घेणार का? नागरिकांकडून शासन व्यतिरिक्त पैसे घेतल्यावर सेतू केंद्रात कोणकोण वाटेकरी आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळावीत असे तक्रारदार यांनी म्हटले आहे.
या घटनेने हवेली महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून या घटनेची परिसरात माहिती वार्याच्या वेगाने पसरली. या घटने नंतर नागरिकांनी समाधान व्यक्त होत आहे.
वंदना दिनेश शिंदे (वय ५०), जयश्री रोहिदास पवार (वय ४५, दोघी नेमणूक सेतू कार्यालय, अप्पर तहसिल कार्यालय हवेली, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला संगणक चालकांची नावे आहेत. या प्रकरणी ४८ वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी भुमिहीन असल्याबाबतचा दाखला मिळण्यासाठी रितसर अर्ज अप्पर तहसिल कार्यालय हवेली, पुणे येथे सादर केला होता. त्यानुसार तक्रारदार यांचा भुमिहीन असल्याबाबतचा दाखला देण्यासाठी पुणे स्टेशन सेतू कार्यालय, अप्पर तहसिल कार्यालय हवेली, पुणे येथील इतर लोकसेवक वंदना शिंदे यांनी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. व तडजोडीअंती ४०० रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, संगणक चालक असलेल्या इतर लोकसेवक वंदना शिंदे यांनी तक्रारदार यांना भूमिहीन असल्याबाबतचा दाखला देण्यासाठी शासकीय शुल्क 34 रुपयांच्या व्यतिरिक्त 400 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. व ही लाच स्वीकारताना वंदना शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. व इतर लोकसेवक जयश्री पवार यांनी सदर लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे दोघींच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, सहकारी पोलीस शेलार, पवार मॅडम यांनी ही कारवाई केली
