अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर, दि. २० जानेवारी २०२५ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर येथे सुरु असलेल्या सुरु असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील जलतरण स्पर्धेत श्रीपाद काळे यांनी १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत रजत पदक तर २०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत कास्य पदक पटकाविले.
महावितरणच्या नागपूर परिमंडलातील बुटीबोरी शहर शाखेत सहायक अभियंता म्हणुन कार्यरत असलेल्या श्रीपाद काळे यांनी या स्पर्धेतील १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत व्दितीय क्रमांक प्राप्त करीत रजत पदक तर २०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करीत कास्य पदक पटकाविले. यापुर्वी मागिल वर्षीच्या “खासदार क्रीडा महोत्सव” या क्रिडा स्पर्धेत जलतरण या क्रीडा प्रकारात १०० मीटर बॅकस्ट्रोक आणि २०० मीटर बॅकस्ट्रोक या दोन्ही स्पर्धेत श्रीपाद काळे यांनी प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदक आणि १०० मीटर फ़्रीस्टाईल स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केले आहे.याशिवाय सुपर मास्टर्स गेम्स ऍन्ड स्पोर्टस फ़ेडरेशन्च्या अखत्यारितील मास्टर्स गेम्स असोसिएशन, गोवा यांच्या विद्यमाने मडगाव, गोवा येथे आयोजित ६ व्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत श्रीपाद काळे यांनी दोन सुवर्ण पदक आणि एक कास्य पदक पटकाविले असून अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्पर्धांतून त्यांची कामगिरी उल्लेखनिय ठरलेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मुख्य अभियंता दिलिप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता पर्फ़ुल्ल लांडे आणि इतर सहका-यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
फ़ोटो ओळ – नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रिडा संस्थेचे प्रशिक्षक अरुण बुटे आणि प्रा.शाम फाळके यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक स्विकारतांना श्रीपाद काळे
