अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी.
चोरीस गेलेला मालमत्ता हस्तगत करण्यास सातारा तालुका पोलिसांना यश:- तालुका पोलिसांचा सन्मान, पोलीस अधीक्षक समीर शेख, संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. सातारा तालुका पोलिसांनी माहे डिसेंबर 2024 मध्ये चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांकडून सातारा तालुका पोलीस ठाणेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले आहे, तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सातारा तालुका पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील, सर्व सामान्यांना प्रथम न्याय देणारे अधिकारी म्हणून निलेश तांबे यांना ओळखले जाते, पोलीस निरीक्षक निलेश तांबे हे जनतेमध्ये ही चांगलेच लोकप्रिय आहेत, सातारा तालुका पोलिसांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दखल घेवुन माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम यांच्या उपस्थितीत सातारा तालुका पोलीस ठाणेला प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले आहे.
