अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
संचालक – संतोष लांडे पुणे महानगर पालिकेच्या समाज विकास विभागाच्या अंतर्गत दिनांक 15 जानेवारी 2025 ला दिव्यांग दीन मेळावा आयोजित करण्यात येत आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पूर्व बैठक पुणे शहरातील दिव्यांग संस्था व दिव्यांगाना समाज विकास विभागाने आमंत्रित केले.
या वेळी मेळाव्याच्या नियोजना बाबत दिव्यांगाना मार्गदर्शन समाज विकास विभागाचे प्रमुख अधिकारी श्री नितीनजी उदासे साहेबांनी केले.तसेच दिव्यांगंच्या योजना संदर्भात माहिती समाजविकास अधिकारी श्री रामदासजी चव्हाण साहेब श्री राजेंद्रजी मोरे साहेब यांनी दिली.
या वेळी मधु तारा दिव्यांग सेवा संस्थेला प्रथमच आमंत्रित केल्याबद्दल मधु तारा प्रमुखांनी समाज विकास विभागाचे आभार मानत मधु ताराच्या राज्यभर चालत असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच दिव्यांगांसाठी आपण अशा बैठका वेळोवेळी घ्याव्यात जेणे करून दिव्यांग आणि समाज विकास विभागाचे वैचारिक समतोल राहुन दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागतील असे मधु तारा प्रमुख म्हणाले.
या प्रसंगी मधु तारा सोबती प्रहारचे श्री गुंडाळ पाटील सर यांनी सुध्धा खूपच छान दिव्यांगांसाठी मार्गदर्शन केले.श्री दादासाहेब आल्हाट सर तसेच अनेक दिव्यांग संस्थेचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते प्रत्येकाने आपले विचार या वेळी व्यक्त केले.
*कार्यक्रमाच्या दरम्यान प्रत्येक दिव्यांगाना चहा तसेच भोजनाची व्यवस्था पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग करेल असे श्री नितीनजी उदासे साहेब म्हणाले.*
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात दिव्यांग मेळाव्याची पूर्व बैठक पार पडली.
या वेळी समाज विकास विभाग अधिकारी वर्गानी अनेक दिव्यांगानी संस्थेच्या पदाधिकारी यांनी मधु ताराच्या कार्याचे कौतुक केले.तसेच आपल्या काही समस्यांसाठी मधु ताराचे सहकार्य अपेक्षित असल्याचे म्हणाले.या वेळी मधु तारा प्रत्येकांसाठी प्रत्येक जण मधु तारा साठी म्हटले.
