अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : नामदेव मंडपे जालना मंठा तालुक्यातील वाई जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा येथे आज दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्या मंडपे. नामदेव व शिवाजी जंजिरे. कैलास जंजिरे उपस्थिती होती
त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री संतोष सरकटे सर आणि प्रमुख अतिथी श्री नारायण उबाळे शाळेय समिती अध्यक्ष . ग्रामपंचायत सदस्य.व शाळेचे सदस्य.नामदेव मंडपे. शिवाजी जंजिरे. कैलास जंजिरे.हे विराजमान होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी उबाळे या विद्यार्थिनी केले सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये श्रेया,रिया प्रधान, सिद्धी कावळे, श्रावणी गोळे, रूपाली प्रधान ,प्रतीक्षा खंदारे ,मयुरी उबाळे, श्रुती चौंडे, दुर्गा खंदारे ,या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे केली आणि शेवटी जिजाऊच्या जीवनावर आधारित प्रतीक्षा खंदारे श्रावणी गोळे श्रुती चौडे आणि ज्ञानेश्वरी उबाळे यांनी सुंदर गीत सादर केले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांची वाचणे आणि जिजाऊ च्या वेशात चंद्रकोरीचे दर्शन सुखव्ह व आणि अभिमानास्पद होतं.
