अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : गोपाळ भालेराव – अखिल भारतीय मराठा महासंघाच्या परभणी जिल्हा कार्यालयात दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परभणी जिल्ह्यात नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली यात मराठवाडा उपाध्यक्षपदी लक्ष्मण मोहिते, जिल्हा कार्याध्यक्षपदी संदीप गव्हाणे तर महिला जिल्हा सरचिटणीस पदी वैशाली जाधव यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी सोपानराव शिंदे यांनी भविष्यात संघटनेत समाज उपयोगी कार्यक्रम कसे असावेत व यातून समाजाचा सर्वांगीण विकास कसा
होईल या संदर्भात अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ 125 वर्षात पदार्पण करत आहे त्या अनुषंगाने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत. संघटन बांधणी हा एक विषय असून याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली यासंदर्भात आठ जानेवारी 2024 रोजी शिवाजीनगर परभणी येथील जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोपानराव शिंदे हे होते तर भगवानराव मोहिते व विठ्ठलराव काळदाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी केंद्रीय कार्यकारिणीच्या सल्ल्याने मराठवाडा अध्यक्ष धाराजी भुसारे यांनी परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या नियुक्ते केल्या या नियुक्तीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी धनाजी भुसारे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कार्य तसेच भविष्यात जे जे उपक्रम राबवायचे त्या संदर्भात माहिती दिली. यावेळी भगवानराव मोहिते यांनी पक्ष बांधणीसाठी सभासद वाढवणे तसेच नियोजनबद्ध कामाचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले तर यावेळी विठ्ठलराव काळदाते यांनी दिशाहीन होत असलेल्या समाजाला दिशा देण्याचे काम या नवीन पदाधिकाऱ्यांच्या मार्फत होईल असे मनोगत व्यक्त करत त्यांना पुढील कामाच्या शुभेच्छा दिल्या तर यावेळी अध्यक्षीय भाषणात सोपानराव शिंदे यांनी संघटने कडून जे समाज उपयोगी कार्यक्रम शतकोतर रोप्य महोत्सवी आयोजन करण्यात आले आहेत त्यामुळे समाजाचा या ग्रुप उपक्रमामुळे सर्वांगीण विकास नक्कीच होईल असे मार्गदर्शन करताना सांगितले. नवीन कार्यकारणीत लक्ष्मणराव मोहिते मराठवाडा उपाध्यक्ष संदीप गव्हाणे जिल्हा कार्याध्यक्ष वैशाली जाधव महिला जिल्हा सरचिटणीस,भास्कर झांबरे, जिल्हा उपाध्यक्ष, रमेश भिसे जिल्हा कोषाध्यक्ष, जिल्हा युवा अध्यक्ष विशाल तनपुरे, गजानन देशमुख जिल्हा सचिव यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवराच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आले.
