अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : सतिश कडु आज दिनांक 03/01/2025 रोजी सायंकाळी 18.00 वाजता ते 19.00 वाजता पर्यंत पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत फुटाळा तलाव येथे अं. 70 ते 80 नागरिकांचे उपस्थितीत पोलीस बँड पथक यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. सदर कार्यक्रमात पोलीस शांतता कमिटी मेंबर महिला दक्षता कमिटी मेंबर व्यापारी आघाडी मेंबर ऑप्टिशियन असोसिएशन मेंबर्स बार असोसिएशन मेंबर, हॉटेल आस्थापना मंडळ मेंबर, तसेच स्वच्छ भारत अभियान पथकाचे प्रतिनिधी मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते, तसेच माननीय सह पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग, अप्पर पोलीस आयुक्त क्राईम, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, पोलीस उपायुक्त मुख्यालय, एसीपी एडमिन मॅडम, एसीपी सदर मॅडम, तसेच अंबादारी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार उपस्थित होते,
सदर कार्यक्रमात मा. सह पोलिस आयुक्त, नागपूर शहर यांनी उपस्थित नागरिकांना पोलीस स्थापना सप्ताह बाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित नागरिकांनी पोलीस विभागाबद्दल आपले मनोगत व्यक्त करून आभार प्रकट केले.
