सातारा | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी
पुसेगांव पोलीस ठाणे ऑनलाइन सादरीकरणात जिल्ह्यात प्रथम पुसेगांव पोलीस ठाणे ठरले, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सी.सी.टी एन.एस कामजमध्ये पुसेगांव पोलीस ठाणेने ही जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ . वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांच्या उपस्थित पुसेगांव पोलीस ठाणेचे स.पो.नि. संदीप पोमण आणि ठाणे अंमलदार अमृता चव्हाण यांना गौरविण्यात आले आहे.नुकत्याच झालेल्या जिल्हा क्राईम बैठकीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे. पुसेगांव पोलीस ठाणेने सी.सी.टी.एन.एस प्रकल्पामध्ये दैनंदिन कामकाजाचे ऑनलाइन सादरीकरण करावे लागते यामध्ये दखल होणाऱ्या तक्रारी गुन्ह्यातील पंचनामे, चार्जशीट फाईल करणे,मोबाईल शोध तांत्रिक माहितीचे अवलोकन करुन पृथक्करण करणे गुन्ह्यांचे अंतिम अहवाल व त्याचे निकालाबाबत अघयावत करणे अशा सर्व गोष्टी ऑनलाइन सादरीकरणात अघयावत ठेवाव्या लागत असतात. अशा या उत्कृंष्ट कामगिरीत जिल्ह्यात प्रथम पुसेगांव पोलीस ठाणे ठरले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेकडील दर महिन्याला आढावा घेतला जातो. आणि प्रथम येणाऱ्या पोलीस ठाणे प्रमुख व अंमलदारांचे विशेष कौतुक करीत त्यांना गौरविण्यात येते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उप विभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या उपस्थितीत पुसेगांव पोलीस ठाणेचे स.पो.नि. संदीप पोमण व महिला अंमलदार अमृता चव्हाण व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
