सांगली | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : अजिंक्य महाराष्ट्र न्यूज
मिरज शहर पोलीस ठाणेचे आणि सर्वसामान्यांना प्रथम न्याय देणारे आणि कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांची विनंतीवरून पोलीस मुख्यालयाकडे बदली करण्यात आली असून. मिरज शहर पोलिस ठाणेच्या प्रभारी म्हणून सध्या जत पोलीस ठाणेचे प्रभारी असलेले पोलीस निरीक्षक अरुण रासकर यांची मिरज शहर पोलीस ठाणेच्या प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे. या बाबतचे आदेश सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत. पोलीस निरीक्षक अरुण सुगावकरांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे विनंती बदलीचा अर्ज दाखल केला होता. पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी मिरज शहर पोलीस ठाणेचा पदभर घेतल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, पोलीस ठाणेच्या हद्दीमधील वाढत्या गुन्हेगारांवर देखील त्यांची कायमच करडी नजर राहिली, त्यांच्या कार्यकाळात प्रलंबित गुन्हे देखील उघडकीस आणण्यात त्यांना यश मिळाले,आगामी सण उत्सव गणेशोत्सव, लोकसभा, विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या. पोलीस निरीक्षक अरुण पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांची सोलापूर जिल्ह्यातून मागील वर्षभरापूर्वी सांगली जिल्हा पोलीस दलात बदली झाली होती, सोलापूर ग्रामीण पोलीस दलात देखील त्यांनी वैरागकर अकलूज,माळशिरस अशा विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली. त्यांच्या उत्कृंष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून पदकांने त्यांना गौरविण्यात आले होते. देखील सांगली जिल्ह्यातही पोलीस मुख्यालयासह त्यांनी मिरज शहर पोलीस ठाणेतही त्यांचा कार्यकाळ उत्कृंष्ट ठरला, कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते.
