दहिवडी | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी
अल्पवयीन विद्यार्थिंनीची माणगंगा नदीत उडी घेवुन आत्महत्या :- दहिवडी येथील घटना आईच्या अश्रूंना बांधा फुटला, दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल, संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. दहिवडी येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींनी मंगळवारी माणगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून आईसमोरच जीवन संपवले या घटनेमुळे माण तालुका चांगलाच हादरला आहे, याबाबत अधिक माहिती अशी की नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ही विद्यार्थिनी शाळेत गेली होती, परंतु दप्तर शाळेमध्ये ठेवून ती कुठेतरी गेली असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले यावेळी शिक्षकांनी तिच्या आईला फोनवरून कळवले होते, तात्काळ आईने शाळेकडे धाव घेतली अनेक ठिकाणी शोधाशोध व जवळच्या नातेवाईकांना फोनवरून विचारण्यात केली परंतु कुठेच तपास न लागल्याने आई शाळेत जवळच येवुन थांबली मुलगी दप्तर घेण्यासाठी येणार म्हणून आई तिथेच थांबून राहिली चार वाजण्याच्या सुमारांस मुलगी शाळेजवळ आली आईला पाहताच ती मारण्याच्या भीतीने पळू लागली मात्र आई तिला थांब थांब म्हणून आवाज देत होती, पण आता आपल्याला आई मारेल, या भीतीपोटी ती माणगंगा नदीच्या दिशेने पळतच सुटली होती, मार खाण्याच्या भीतीने तिने नदीच्या पुलावरून उडी मारली आईने आरडाओरडा करून नागरिकांना जमविले परंतु शोध घेण्यास उशीर लागला, अखेर मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले, तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, या घटनेमुळे माण तालुक्यांत एकच खळबळ उडाली होती, घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाणेचे स.पो.नि. अक्षय सोनवणे यांनी आपल्या स्ट्रापसह घटनास्थळी धाव घेतली.
