मुंबई | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : दौलत सरवणकर
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई परिसरात बेस्ट प्रशासनाकडून स्मार्ट मीटर लावण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना भरमसाठ लाइटबिल आल्यामुळे वीज ग्राहक त्रस्त असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, माजी आमदार श्री दगडू दादा सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली बेस्टचे महाव्यवस्थापक श्री अनिल डिग्गीकर यांच्याकडे शिष्टमंडळाने भेट देऊन सदर मीटर लावण्यात येऊ नयेत, तसेच यापूर्वी लावलेले मीटर काढून पूर्वीचे मीटर लावण्यात यावेत, अशा प्रकारचे निवेदन दिल्यानंतर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि तातडीने त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासित केले. सदर शिष्ट मंडळात उपस्थित शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर,सुहास सामंत,अरविंद नेरकर,आमदार श्री महेश सावंत,मा.बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर अनिल कोकीळ, रंजन चौधरी, विभाग प्रमुख संतोष शिंदे.शंकर सकपाळ, बेस्ट चे सहाय्यक महाव्यवस्थापक (वि पु) श्री.बिलाल शेख आदी उपस्थित होते.
